भक्तीचा महाकुंभ: यवतमाळच्या दानशूर भक्ताने तुळजाभवानी चरणी अर्पण केली १ लाख ९ हजारांची देणगी!
तुळजापूर प्रतिनिधी : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी चरणी भाविक भक्तांने.
आई राजा उदे उदे… च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील एका भाविकाने श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी मोठी देणगी अर्पण करत आपली श्रद्धा व्यक्त केली आहे. वडगांव (ता. पुसद) येथील रहिवासी सौरभ भीमराव राठोड यांनी आई साहेबांच्या चरणी १ लाख ९ हजार रुपयांची रोख देणगी सुपूर्द केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ राठोड हे आपल्या परिवारासह तुळजापूर येथे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले होते. विधीवत दर्शन आणि अभिषेक पूजा संपन्न झाल्यानंतर, त्यांनी आपल्या श्रद्धेपोटी ही दातृत्वाची पावती मंदिर संस्थानकडे सोपवली.
मंदिर संस्थानतर्फे गौरव –
राठोड कुटुंबाच्या या भक्तिभावाचा आदर करत, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. देवीची प्रतिमा आणि पवित्र महावस्त्र देण्यात आले.
यावेळी सहायक जनसंपर्क अधिकारी अतुल भालेराव, विश्वास सातपुते आणि मंदिर संस्थानचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
”देवीच्या आशीर्वादाने सर्व काही प्राप्त होते, हीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही ही छोटीशी सेवा अर्पण केली आहे,” अशी भावना यावेळी राठोड कुटुंबाने व्यक्त केली.
आई तुळजाभवानीच्या दरबारात दातृत्वाचा हा ओघ कायम असून, राठोड यांच्या या दातृत्वाची चर्चा मंदिर परिसरात होत आहे. अशा दातृत्वाने मंदिर समितीला भाविक भक्तांच्या सुख सोयींकडे अधिक प्रखरतेने लक्ष देता येईल.






