Best News Portal Development Company In India

पेठ सांगवी येथे बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन ! तुरोरी दमयंती भालेराव.

पेठ सांगवी येथे बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन .

तुरोरी दमयंती भालेराव.

दि.१६. उमरगा तालुक्यातील पेठ सांगवी येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती पेठ सांगवी यांच्या वतीने भीम नगर येथे सकाळी ८ वाजता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये सकाळी८ वाजता विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुणे महानगरपालिकेचे माजी अभियंता एस के सुरवसे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.तर ध्वजारोहण माजी सैनिक कमलाकर सुरवसे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व उपस्थितांनी तथागत भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून ध्वजाला जय भीम ची सलामी देण्यात आली. तर यावेळी सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून अभिवादन करण्यात आले.
. संविधान चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांनी केले. यावेळी त्रिशरण पंचशील ग्रहण करून अभयारण करण्यात आले. यावेळी इंजिनीयर विद्यासागर शंकर सुरवसे यांची नुकतीच जलसंपदा विभागामध्ये औरंगाबाद येथे निवड झाल्यामुळे त्यांचा सन्मान जयंती उत्सव समितीच्या वतीने यावेळी करण्यात आला. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पनाताई गुंजोटे यांनी केंद्रप्रमुख परीक्षा मध्ये यश संपादन केल्यामुळे त्यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या टीईटी परीक्षेमध्ये यश संपादन केलेले शिक्षक राजेंद्र सरवदे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. गावातील जमादार या तरुणांनी पोलीस भरतीमध्ये यश संपादन केल्यामुळे त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी एस के सुरवसे साहेब यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आवर्जून उपस्थित असलेले माजी सरपंच गणेश पाटील, आता मग समितीचे उपाध्यक्ष संतोष पाटील,ग्रामपंचायतचे सदस्य संजय माळी, सरपंच प्रतिनिधी शब्बीर मुजावर, माजी सरपंच प्रतिनिधी धनराज सुभेदार, माजी ग्रामपंचायत सदस्य नागनाथ यमगर, माणिकराव देशमुख, शालेय समितीचे अध्यक्ष संतोष पाटील,राजेंद्र सुरवसे, बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे, जनार्दन सुरवसे आनंद सुरवसे काकासाहेब कांबळे, गौतम सुरवसे, प्रमोद सुरवसे, सुशील सुरवसे, विशाल कांबळे, निळकंठ सुरवसे, समाधान सुरवसे, इंजिनीयर भाग्यश्री सुरवसे, बेबी नंदा सुरवसे, बेबी नंदा गायकवाड, छायाबाई गायकवाड, अनिता सुरवसे, सखुबाई कांबळे, मुख्याध्यापिका कल्पना गुंजोटे, शिक्षिका अंगुलमाला सुरवसे, गोल्डन सुरवसे, सुमित सुरवसे, सचिन सुरवसे, लखन सुरवसे, अक्षय कांबळे, संदीप सुरवसे, अभिनंदन सुरवसे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक बौद्धाचार्य उमेश सुरवसे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार पोलीस पाटील ईश्वर सुरवसे यांनी मानले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india