Best News Portal Development Company In India

राज्यस्तरीय विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत माडज ग्रामीण प्रशालेचे घवघवीत यश ! ततरोरी दमयंती भालेराव.

राज्यस्तरीय विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत माडज ग्रामीण प्रशालेचे घवघवीत यश

ततरोरी दमयंती भालेराव.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई आयोजित ‘विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा 2026’ या स्पर्धेत ग्रामीण प्रशाला, माडज (ता. उमरगा) या शाळेने घवघवीत असे यश संपादन केले आहे. राज्य शासनातर्फे आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा शहरी आणि ग्रामीण या दोन भागांमध्ये आयोजित करण्यात आली होती. ग्रामीण विभागातून राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तरिय स्पर्धेत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत असे यश मिळवले आहे. रामेश्वर दाजीबा फुगटे व किरण दयानंद सुगावे या इयत्ता नववीच्या दोन विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर चौथा क्रमांक मिळवला आहे. रोख सात हजार पाचशे रुपये, प्रमाणपत्र व मेडल असे बक्षीस या विद्यार्थ्यांनी पटकावले आहे. तर संस्कार विठ्ठल नागणे आणि प्रणिता दिनकर पाटील या इयत्ता नववीच्या दोन विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर पाचवा क्रमांक मिळवला आहे. रोख पाच हजार रुपये, प्रमाणपत्र व मेडल असे बक्षीस या विद्यार्थ्यांनी पटकावले आहे. जिल्हास्तरावर समर्थ नंदकुमार जाधव, प्रतिक विठ्ठल भोसले व प्रतीक्षा बाळू फुगटे या विद्यार्थ्यांनी क्रमश: प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला आहे. या विद्यार्थ्यांनी तीन हजार, दोन हजार व एक हजार रूपये रोख, प्रमाणपत्र आणि मेडल असे बक्षीस पटकावले आहे. तालुकास्तरावर निकिता नवनाथ सूर्यवंशी व ईश्वर शिवशरणाप्पा कुंभार या विद्यार्थ्यांनी क्रमशः द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे‌. या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक हजार व पाचशे रुपये रोख, प्रमाणपत्र व मेडल असे बक्षीस पटकावले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना उपक्रम शिक्षक डॉ. बालाजी मदन इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री बाळासाहेब पेठसांगवीकर, डॉ. बालाजी मदन इंगळे, विक्रम चव्हाण, व्यंकटेश चव्हाण, पांडुरंग मुंडकर, उदय राठोड, श्रीमती अनिता कांबळे या शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते एका विशेष कार्यक्रमात मुंबई येथे या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india