हॅपी थॉट्स तेजज्ञान फाउंडेशन संचलित पुणे येथील अध्यात्मिक गुरू सरश्री लिखित तेजरथाचे उमरगा शहरात आगमन सकारात्मक विचाराने माणसाचे परिवर्तन.
तुरोरी दमयंती भालेराव.
हॅपी थॉट्स तेजज्ञान फाउंडेशन संचलित पुणे येथील अध्यात्मिक गुरू सरश्री लिखित तेजरथाचे उमरगा शहरात आगमन सकारात्मक विचाराने माणसाचे परिवर्तन संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह देशभरात प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी उमरगा शहरातील शासकीय न्यायालयाच्या समोर राष्ट्रीय महामार्गालगत रथाचे स्वागत फाऊंडेशनचे शाखाप्रमुख सुरेश गिरबने गुरूजी यांच्या हस्ते शुक्रवार दि. १७ रोजी सकाळी करण्यात आले.
यावेळी आदर्श भोसले, शिवराज सोमवंशी, मंथन पाटील, रमेश मुडगे, डॉ. विक्रम आळंगेकर, लक्ष्मण पवार यांची यावेळी उपस्थिती होती.
धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग, जळकोट या ठिकाणी रथाचे स्वागत करण्यात आले होते. आज शुक्रवारी सकाळी उमरगा येथे स्वागत करण्यात आले. यावेळी वाचक मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसत होते.






