Best News Portal Development Company In India

यशवंत नगर मुरुम येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे शरण पाटिल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले!

यशवंत नगर मुरुम येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे शरण पाटिल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाकडून मुरूम शहरातील यशवंत नगर येथील भारतरत्न डॉ. आंबेडकर चौकात आयोजित भव्य रक्तदान शिबिरात शरण पाटील यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच फीत कापून रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
समाजहितासाठी रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार असून, हीच खरी भारतरत्न डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करण्याची सर्वोत्तम पद्धतीचा संकलप आहे.
यावेळी मुरूम नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, नगरसेवक गौस शेख, योगेश राठोड, राजकुमार आंबुसे, सचिन मुके, नागशेन गायकवाड, प्रा. सतीश रामपुरे, आनंदकुमार कांबळे, किरण गायकवाड, विकी गवई, अमर भालेराव, निर्मलकुमार लिमये, अरुण बावा, सतीश सावंत, संतोष कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, समीर सोमवंशी, शुभम सावंत, उत्कर्ष गायकवाड, पार्थ कदम, निखिल गायकवाड, विनायक कांबळे, शुभम शिरोळे, विवेक भालेराव, आशुतोष गायकवाड, अनंत कांबळे सह जयंती उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india