Best News Portal Development Company In India

भक्तीचा महापूर : कर्नाटकच्या भाविकाकडून तुळजाभवानी चरणी ३ लाखांचे दान!

भक्तीचा महापूर : कर्नाटकच्या भाविकाकडून तुळजाभवानी चरणी ३ लाखांचे दान!
तुळजापूर प्रतिनिधी :-
आई राजा उदो-उदोच्या जयघोषात कर्नाटक राज्यातील एका भाग्यवान भक्ताने श्री महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या चरणी आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. हुमनाबाद तालुक्यातील नांदगाव (जि. बीदर) येथील रहिवासी आणि देवीचे परमभक्त मल्लिकार्जुन कलगी यांनी आज मंदिर संस्थानला ३ लाख रुपयांची रोख देणगी जगदंबे प्रति सेवाभाव दाखवत अर्पण केली.
भाविक भक्त मल्लिकार्जुन कलगी हे आज श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात आले होते. गाभाऱ्यात देवीचे दर्शन घेतल्यानंतर, त्यांनी आपली ही देणगी अधिकृतपणे मंदिर संस्थानकडे सुपूर्द केली. आई भवानीवरील अढळ श्रद्धेपोटी त्यांनी ही मदत दिल्याचे यावेळी सांगितले.
मंदिर संस्थानकडून यथोचित गौरव करण्यात आला.
या दातृत्वाचा सन्मान म्हणून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने मल्लिकार्जुन कलगी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांना देवीची स्मृतीचिन्ह म्हणून प्रतिमा भेट देण्यात आली.
या छोटेखानी सोहळ्याला खालील मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई, श्री जगतजनांनी तुळजाभवानी चरणी नतमस्तक होऊन माणसाच्या आयुष्यात अनेक चढउतार येत असतात यश अपयश येत असतात. देवीच्या आशीर्वादाची परतफेड म्हणून भाविक भक्त दानधर्म करतात.
याप्रसंगी उपस्थित मान्यवर ,अभिजीत तेरखेडकर (जनसंपर्क अधिकारी, मंदिर संस्थान)
मंदिर संस्थानचे अन्य कर्मचारी आणि पदाधिकारी.
“भक्तांच्या दातृत्वामुळेच मंदिरातील विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांना बळ मिळते. कलगी यांच्या या दातृत्वाबद्दल मंदिर प्रशासनाने त्यांचे आभार मानले आहेत.”आणि त्यांनी दिलेल्या सेवाभावनेचा स्वीकार केला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india