Best News Portal Development Company In India

अतनूर येथे अखंड हरिनाम सप्ताह व महाशिवपुराण कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणला सुरुवात ! उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

अतनूर येथे अखंड हरिनाम सप्ताह व महाशिवपुराण कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणला सुरुवात !
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
२३ एप्रिल रोजी दुपारी ह.भ.प.श्री.विश्वनाथ महाराज यांचे गुलालाचे कीर्तन तसेच रात्री ह.भ.प.श्री.चंद्रशेखर महाराज देगलूरकरांचे किर्तन, २४ एप्रिल रोजी शुक्रवारी दुपारी ह.भ.प.श्री.पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे काल्याचे किर्तन तर ह.भ.प.श्री.निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे रात्री ९ ते ११ यांचे कीर्तन होईल. शुक्रवारी काल्याचे किर्तनाने होणार सांगता.

जळकोट तालुक्यातील अतनूर येथील श्री.सदगुरू घाळेप्पा स्वामी महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी १५० व्या. सजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त श्री.काशी विश्वनाथ महादेव मंदिर संस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व शिवपुराण महाकथेला शुक्रवार दि.१७ एप्रिल रोजी धार्मिक वातावरणात ह.भ.प. परमेश्वर महाराज शहापूरकर यांच्या कीर्तनाने सुरुवात झाली.
अतनूर येथे दि. १६ एप्रिल ते २२ एप्रिल पर्यंत दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत ह.भ.प.सौ. कान्होपात्राताई कुंडलवाडीकर महाशिवपुराण कथाकार यांचे कथा होईल. तसेच दि.१७ एप्रिल ते २४ एप्रिल या कालावधीत किर्तनकारांसह हा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला असून परिसरात आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे. दैनंदिन भरगच्च कार्यक्रम या सप्ताहामध्ये दररोज पहाटे ६ ते ७ श्री. घाळेप्पा स्वामी महाराजांचा रुद्राभिषेक, ७ ते १० श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथा वरील भजन, २ ते ५ महापुराण कथा, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, ९ ते ११ हरिकिर्तन, रात्री १२ ते ४ हरिजागर, पहाटे ४ ते ६ काकडा आरती, दररोज दि. १७ एप्रिल रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प.श्री.परमेश्वर महाराज शहापूरकर यांच्यापासून सुरुवात होऊन दि. १७ एप्रिल ते २४ एप्रिल या कालावधीत महाराष्ट्रातील नामावंत कीर्तनकाराची कीर्तन रंगणार आहेत. नंतर हरीजागर कीर्तन महोत्सवाला प्रमुख वक्ते सप्ताहात दररोज विविध मान्यवर कीर्तनकाराची सेवा लाभणार आहे. यात प्रामुख्याने १७ एप्रिल रोजी परमेश्वर महाराज, १८ एप्रिल रोजी ह.भ.प.कु. कांचनाताई शिवानंद शेळके आडमपूर, १९ एप्रिल रोजी ह.भ.प.श्री.मधुकर महाराज सावळकर, २० एप्रिल रोजी ह.भ.प. सौ.कान्होपात्राताई कुंडलवाडीकर, २१ एप्रिल रोजी ह.भ.प.श्री.बाळू महाराज गिरगावकर, २२ एप्रिल रोजी ह.भ.प.श्री. कबीर महाराज आतार शिवव्याख्याते, २३ एप्रिल रोजी ह.भ.प.विश्वनाथ महाराज आतनुरकर, दुपारी तर दि.२३ एप्रिल रोजी संध्याकाळी ८:३० ते ११:३० वाजता ह.भ.प.चंद्रशेखर महाराज देगलूरकर, २४ एप्रिल रोजी ह.भ.प.श्री.पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे दुपारी काल्याचे किर्तन व सांगता होणार असून दुपारी दोन ते पाच या वेळेत दिव्य महाप्रसादाचे भाविकांसाठी आयोजन करण्यात आले आहे. दि.२४ एप्रिल रोजी रात्री ८.३० ते ११.३० वाजता ह.भ.प.श्री.समाधान महाराज केजकर भागवताचार्य यांचे कीर्तन होणार आहे. या सोहळ्याला पंचकोशीतील व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आव्हान श्री.महादेव मंदीर टेम्पल मंदिराचे तसेच काशी विश्वनाथ संस्थान मंडळाचे पदाधिकारी व भजनी मंडळ व समस्त गावकरी मंडळी अतनूर यांच्या वतीने करण्यात आले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india