Best News Portal Development Company In India

अपघात नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करा अन्यथा थेट कारवाई आ. स्वामींचा इशारा ! उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.

अपघात नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करा अन्यथा थेट कारवाई आ. स्वामींचा इशारा

उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर तातडीने ठोस उपाययोजना राबवून अपघातांची संख्या कमी करावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. अतिवेगाने वाहन चालविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ विरोधात विशेष मोहीम सातत्याने राबवावी, असे निर्देश आमदार प्रवीण स्वामी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवार (दि.१६) आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा शल्यचिकित्सक धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश हरिदास, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके, सहाय्यक पोलिस निरीक्षक निशिकांत शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमृता पटायात, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच रस्ते महामार्ग सुरक्षा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. स्वामी यांनी सध्या ओळखण्यात आलेल्या अपघातग्रस्त ‘ब्लॅक स्पॉट’ ठिकाणी तात्काळ उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. आरटीओ, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त पाहणी करून आवश्यक दुरुस्त्या तातडीने पूर्ण कराव्यात, असे त्यांनी सांगितले. तसेच महामार्गावर नियमित गस्त ठेवून रोटेशननुसार पथके व वाहने तैनात करावीत असे निर्देश देण्यात आले. उमरगा-लातूर मार्गावर विशेष पथक नेमून आवश्यकतेनुसार बॅरिकेडिंग करणे, पावसाळ्यापूर्वी अंडर ब्रिज खालील नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती पूर्ण करणे, तसेच येणेगूर, आष्टामोड, तुरोरी येथील अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नळदुर्ग येथे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करण्याचेही आदेश देण्यात आले. अपघात झाल्यास तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यावरही त्यांनी भर दिला. अतिवेगाने वाहन चालविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ विरोधात विशेष मोहीम सातत्याने राबवावी, असे निर्देशही त्यांनी दिले. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आ. स्वामी यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे बजावले. उपाययोजना राबविण्यात हलगर्जीपणा झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा आ.प्रवीण स्वामी यांनी दिला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india