Best News Portal Development Company In India

वागदरी येथे “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” या अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न !

वागदरी येथे “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” या अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
———————————————————-
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” या अभियाना अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे दि.१८एप्रिल२o२६ रोजी आरोग्य तपासणी शिबिर घेऊन या अभियानाबद्दल माहिती देण्यात आली.
. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक १८फेब्रुवारी २o२६ रोजी “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” या महत्त्वकांक्षी अभियानाचा शासन निर्णय प्रसिध्द केला असून दि.०१ एप्रिल २o२६ पासून या अभियानाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.
दि.१ ते ३० एपिल २o२६ दरम्यान शासनाने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर या अभियानात सहभागी होत असल्याची नोंद त्या त्या ग्रामपंचायतीने करावयाची आहे. या अभियानात जिल्हा स्तरावर विभागीय स्तरावर राज्यस्तरावर प्रथम द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या ग्रामपंचायतींना रोख रक्कम पारितोषिक म्हणून दिले जाणार आहे.
त्याचाच भाग म्हणून तुळजापूर तालुक्यातील वागदरी या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून या अभियानात सहभागी होण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा करण्यात आली असून या प्रसंगी या अभियाना विषयी जनजागृती करण्यासाठी गावात ग्रामसभा घेणे,भितीपत्रके पोस्टर्स लावणे,भिंती रंगविणे, ग्रामस्तरावर सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक प्रतिनिधी,अशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती,आदीना सहभागी करून घेऊन एक समिती गठीत करणे असी सविस्तर माहिती डॉ.यशवंत नरवडे यांनी ग्रामस्थाना दिली.
या आरोग्य तपासणी शिबिरात येथील महिला ग्रामस्थ युवा कार्यकर्ते यांची रक्तदाब तपासणी, शुगर तपासणी व अन्य इतर आजाराबद्दल ची प्राथमिक तपासणी करून प्रथमोपचार करण्यात आला.
यावेळी डॉ.यशवंत नरवडे,आरोग्य सेवक रजूबअली हावलदार,अशा कार्यकर्ती पार्वतीबाई बिराजदार यांनी आरोग्य तपासणीचे काम पाहिले व गरजूंना प्रथमोपचार म्हणून औषध गोळ्या देण्यात आल्या. या प्रसंगी रोजगार सेवक रामसिंग परिहार,नामदेव यादव,किशोर धुमाळ,एस.के. गायकवाड, मोहन धुमाळ ग्रा.प.सदस्या सुरेखाताई यादव, शिलाबाई बिराजदार सह ग्रामस्थ,महिला,युवक उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india