Best News Portal Development Company In India

सुरत गाव येथे भव्य ग्रामीण बिच क्रिकेट स्पर्धेचे शरण पाटिल यांच्या हस्ते उद्घाटन ! उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

सुरत गाव येथे भव्य ग्रामीण बिच क्रिकेट स्पर्धेचे शरण पाटिल यांच्या हस्ते उद्घाटन .
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
तुळजापूर तालुक्यातील सुरत गाव येथे भव्य ग्रामीण बीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेअसुन या स्पर्धेच्या उद्घाटन शरण पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
तसेच सर्व खेळाडूंना शरण पाटील यांच्या वतिने मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

ग्रामीण भागातील तरुणांमध्ये खेळाप्रती आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील खेळाडूवृत्ती आणि संघभावना वृद्धिंगत व्हावी यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल आयोजकांचे कौतुक करत, भविष्यातही अशाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी उद्घाटन प्रसंगी आयोजक दादासाहेब घोडके, ॲड. अरविंद बेडगे, जिल्हा परिषद सदस्य योगेश राठोड, सागर पाटील, राजू मुल्ला, हनुमंत रोमन, नेताजी डांगे, हरिभाऊ जाधव तसेच माजी सैनिक शिवाजीराव सावंत, तामलवाडी ग्रामपंचायत सदस्य सतीश माळी, खंडू पावले, दादासाहेब काडगावकर, राज सुरते, सागर नकाते, विजय सोनकटाळे, कुणाल येळणे, आदींसह ग्रामस्थ व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india