Best News Portal Development Company In India

जेवळी येथे विविध क्षेत्रातील बसवरत्नांचा पुरस्कारदेवुन सन्मान सोहळा संपन्न !

जेवळी येथे विविध क्षेत्रातील बसवरत्नांचा पुरस्कारदेवुन सन्मान सोहळा संपन्न.

उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वर यात्रेच्या निमित्ताने विविध क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केलेल्या गुणवंताचा गुणगौरव महात्मा बसवेश्वर यात्रा कमिटी जेवळी यांच्या वतीने मंगळवार दिनांक २१एप्रिल रोजी आयोजीत करण्यात आलेला होता. वादळी वारे व अवकाळी पावसामुळे नियोजीत कार्यक्रमामध्ये बदल करून बुधवार दिनांक २२ एप्रिल रोजी श्री सिद्धेश्वर विरक्त मठ जेवळी येथे म. न. प्रि. गुरू गंगाधर महास्वामिजीच्या हस्ते संपन्न करण्यात आला.

यावेळी विविध क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केलेल्या ७ गुणवंताची निवड करून सन्मानचिन्ह व सन्मानपत्राने सन्मानीत करण्यात आले.
श्रीमान वसंतराव देविदास पोतदार – सामाजिक कार्य, श्रीमान सुनिल बापूसाहेब देशपांडे – आदर्श व्यक्तिमत्व, श्रीमान संतोष उपासे – संशोधन विभाग,श्रीमान मल्लिनाथ सिद्रामप्पा सोळसे – आदर्श शिक्षक, श्रीमान बाबा भिलू राठोड – पोलिस दलातील अतुलनिय कामगिरी,श्रीमान पाडुरंग महादेव होनाजे – युवा शेतकरी, विशाल महादेव होनाजे – युवा शेतकरी या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

सन्मान सोहळा प्रसंगी माजी मुख्याध्यापक बी. एम. बिरादार सर, ॲडव्होकेट मनोज चटगे, अभियंता प्रसाद पाटील, संजय तांबडे , राजू डिग्गे, रोहित कारभारी व गावकरी उपस्थित होते.

प्रति वर्षाप्रमाणे या ही वर्षी श्री महात्मा बसवेश्वर यात्रा कमिटीने विविध क्षेत्रामधील गुणरत्नाची पारख करून नवतरूणाना प्रेरणा देणारा उपक्रम राबवत असल्यामुळे गावकरी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी आनंद व्यक्त करुन अभिनंदन करण्यात आले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail