पत्रकार बाबासाहेब कांबळे यांना उमरगा पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली .
उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील प्रयोगशाळा परिचर तथा पत्रकार बाबासाहेब कांबळे यांना उमरगा तालुका पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
बाबासाहेब कांबळे हे येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचर या पदावर सेवेत होते. त्यांनी दैनिक पुढारी या वृत्तपत्राचे प्रतिनिधी आणि मराठवाडा साहित्य परिषदेवर कार्यकारणी सदस्य म्हणून त्यांनी काम केले बाबा कांबळे यांना अध्यात्मिक,धार्मिक,सांप्रदाईक क्षेत्रातील ओढ होती त्याचे वडिल बंका या संताच्या संगतीत असल्याने साधुसंतांच्या वारकरी सांप्रदायिक पगडा त्याच्यावर रुजल्याने ते उमरगा येथुन पंढरपूर वारी करण्याचा छंद मनाशी होता.
बुधवारी (दि.२२) पहाटे साडेपाच वाजता अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी ते ५८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी येथील शासकिय विश्रामगृह येथे त्यांना उमरगा तालुका पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पत्रकार अविनाश काळे, पत्रकार मारुती कदम, पत्रकार शंकर बिराजदार, पत्रकार गो.ल. कांबळे, प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष विजय ओवांडकर यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी
पत्रकार नारायण गोस्वामी, सुभाष जेवळे, समीर सुतके, अंबादास जाधव, प्रदीप भोसले, अमोल पाटील, माधव सुर्यवंशी, विकास गायकवाड, विश्वास सोनकांबळे, विशाल देशमुख, शिक्षक राजू सुर्यवंशी यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतिने पत्रकार बाबा कांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.





