सिंहासन पूजेत नियमांचे उल्लंघन
सुरक्षा कंपनीला १ लाख रुपये दंड तर पुजाऱ्यास ५ वर्षे मंदिर बंदी.मंदिर संस्थांचा निर्णय.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
श्री तुळजा भवानी मातेची झीज रोखण्यासाठी पुरातत्त्व विभागाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत,मंगळवार दि.२१ सकाळी मातेची सहावी सिंहासन पूजा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी मंदिर संस्थानाने कठोर पावले उचलत, संबंधित पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिर प्रवेशबंदी केली आहे.तसेच,या अक्षम्य सुरक्षेतील हलगर्जी पणाबद्दल खासगी सुरक्षा रक्षक कंपनीला तब्बल एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.अशी माहिती मंदिर संस्थांचे तहसीलदार तथा व्यवस्थापक माया माने यांनी दिली.
घडलेला प्रकार असा मंगळवारी सकाळच्या अभिषेक पूजा वेळेस 5 सिंहासन पूजा असतात पण या दिवशी सहा पूजा झाल्या.मंदिरच्या नियमावलीत दररोज केवळ ७ सिंहासन पूजा सकाळी ५ आणि सायंकाळी २ करण्याची परवानगी आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या नियमाचे काटेकोर पालन केले जात होते. मात्र, मंगळवारी सकाळी धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाला हरताळ फासत, पाच ऐवजी सहावी सिंहासन पूजा पार पडली.विशेष म्हणजे, यावेळी मंदिरात ३ सुरक्षा निरीक्षक, ३
सहायक सुरक्षा निरीक्षक आणि ३ धार्मिक व्यवस्थापक उपस्थित होते. या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळेच हा गैरप्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
कारवाईचा बडगा या गंभीर प्रकारानंतर मंदिर संस्थानाने तातडीने कठोर कारवाई केली आहे:
** पुजाऱ्यावर कारवाई : नियमांचे उल्लंघन करून पूजा
घालणाऱ्या संबंधित पुजारी अभिजित कुतवळ
यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला ५
वर्षे मंदिर प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
** सुरक्षा कंपनीला दंड: सुरक्षेत कसूर केल्याप्रकरणी
संबंधित खासगी सुरक्षा कंपनीला १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
**अधिकाऱ्यांना नोटीस: सुरक्षारक्षकां कडून या प्रकरणाचा लेखी खुलासा मागवण्यात आला असून,त्यानंतर
त्यांच्यावरही कारवाई केली जाणार.





