Best News Portal Development Company In India

चार धाम यात्रा मावंदे निमित्ताने,काशी मावंदे यज्ञ याग,गंगापुजन,होमहवन , श्रीमद् भागवत कथेची सोहळ्याची गाथा मिरवणुने व किर्तनसेवा,गोपाळ काल्याने सांगता.

चार धाम यात्रा मावंदे निमित्ताने,काशी मावंदे यज्ञ याग,गंगापुजन,होमहवन , श्रीमद् भागवत कथेची सोहळ्याची गाथा मिरवणुने व किर्तनसेवा,गोपाळ काल्याने सांगता.
तुरोरी दमयंती भालेराव.
तालुक्यातील आष्टा (जहागीर)येथिल सद्भक्त मोहणराव कृष्णाजी व सौ.भारताबाई मोहणराव गायकवाड हे दांपत्य चारधाम यात्रा दर्शन सोहळा केल्यामुळे चारधाम यात्रा मावंदे यानिमित्ताने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे दि.१९ ते २५ रोजी पर्यत स्वगृही आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते ह.भ.प.कैवल्य(भाऊमहाराज) चातुर्मास्ये पंढरपूरकर याची सुदर कथा भाविक भक्तासमवेत सात दिवस नित्यनियमाने भक्ती मय वातावरणात पार पडण्यात आली.
दि.२४ रोजी सकाळी ७ ते ११ काशीमावंदे याचे यज्ञ याग,गंगापुजन, होम हवन करण्यात आले तदनंतर दिवसभर महाप्रसाद वाटप करण्यात आला.
दि.२५रोजी ज्ञानेश्वरी,या ग्रंथाची टाळ,पंखवाज, फटाक्यांची अतिषबाजी करीत नामघोषाच्या जय जय कारात भाविक भक्त गणासहक्ष गावातील प्रमुख मार्गावरून ग्रंथ दिंडी काढुन श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता करण्यात आली.
तद्नंतर ११ते१ दामोदर मठसंस्थानचे मठाधिपती १००८ महंत अवधुतपुरी महाराज यांचे गोपाळ काला निमित्ताने गावातील लहानथोर भाविक भक्तगणासमवेत किर्तनसेवा होऊन कथेचा आणी गोपाळ काल्याचा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी कथा संगत ह.भ.प.हणुमंत खपाले दासुरकर,ह.भ.प. रोहित तरंगे,वाकाटीकर, ह.भ.प.बाळु जाधव खोरोचीकर,ह.भ.प. कृष्णा जमादार तुरोरीकर, बाळकृष्ण ( आनिल) मोहणराव गायकवाड, चि.हर्षवर्धन( चंद्रशेखर)राहुल गायकवाड,
सरपंच सतिष जमादार, उपसरपंच, बापुराव गायकवाड, पोलीस पाटील, महेश जाधव, विणेकरी रमेश गायकवाड, तुकाराम गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड,सचिन गायकवाड,शिवाजी गायकवाड,अमोल गायकवाड, ग्रामपंचायत शिपाई ज्ञानेश्वर गायकवाड, शिद्धेश्वर जमादार,अदिसह भाविक भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india