धक्कादायक: तामलवाडीतील ‘मिलन लॉज’वर पोलिसांचा छापा; देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश, दोघे अटकेत !
तुळजापूर प्रतिनिधी :- अनैतिक देहव्यापार व्यवसायाची पाळीमुळे खोलवर रुचली केली आहेत. सखोल तपास करण्याची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावरील हॉटेल आणि लॉजच्या नावाखाली चालणाऱ्या काळ्या धंद्यांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने (AHTU) मोठी कारवाई केली आहे. तामलवाडी येथील **’मिलन लॉज’**वर पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात आलेल्या तीन महिलांची सुटका केली असून, दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
गुप्त माहितीवरून टाकली जाळी
मिळालेल्या माहितीनुसार, ‘मिलन लॉज’ येथे महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची टीप पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस पथकाने तातडीने या लॉजवर छापा टाकला.
आरोपींची नावे आणि तपशील
या कारवाईत पोलिसांनी खालील दोन आरोपींना अटक केली आहे:
१. दिलीप सिध्दाप्पा मंगरुळे (वय ४३ वर्ष, रा. सोलापूर)
२. संतोष नामदेव पवार (वय ४० वर्ष, रा. तिऱ्हे, उत्तर सोलापूर)
हे दोघेही सध्या मिलन लॉज, तामलवाडी येथे वास्तव्य करून हा व्यवसाय चालवत होते. तपासात असे समोर आले की, हे आरोपी महिलांना आश्रय देऊन त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत होते आणि त्यावरच स्वतःची उपजीविका करत होते.
हस्तगत केलेला मुद्देमाल
छाप्यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण २५,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे:
२ मोबाईल फोन
पिग्मी पासबुक आणि नोंदीचे रजिस्टर
युपीआयडी (UPI) स्कॅनर मशिन
लॉजचा परवाना फॉर्म
५,७०० रुपये रोख रक्कम आणि इतर साहित्य.
पोलीस कारवाई: > सुटका करण्यात आलेल्या तीनही महिलांची महिला पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली असून त्यांची सुरक्षित मुक्तता करण्यात आली आहे.
या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात दि. २४ एप्रिल २०२६ रोजी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३, १४४, ३(५) सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम (PITA) कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा (गु.र.नं. ६०/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, बेकायदेशीर लॉज चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. असे अनैतिक धंदे करणाऱ्या विरुद्ध जोरदार मोहीम राबवली पाहिजे नागरिकातून आता याची मागणी होत आहे. सदर कारवाईमुळे तामलवाडी पोलिसांवरती जनसामान्यातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.





