Best News Portal Development Company In India

गुजनूर येथे आरोग्य शिबिर संपन्न !

गुजनूर येथे आरोग्य शिबिर संपन्न
———————————————
नळदुर्ग (एस. के. गायकवाड ):
” महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव” या अभियान अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील मौजे गुजनूर या ठिकाणी आरोग्य शिबिर घेण्यात आले.
दि.२५ एप्रिल रोजी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे गुजनूर तालुका तुळजापूर येथे माझं गाव आरोग्य संपन्न गाव या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अभियानांतर्गत आरोग्य शिबिर घेण्यात आले.
प्रारंभी डॉ.यशवंत नरवडे यानी उपस्थितना या शिबिरा विषयी थोडक्यात माहिती देवून या शिबिराला सुरुवात करण्यात आली.
या वेळी माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाबत आरोग्य समिती स्थापन करण्यात आली.तसेच ३० वर्षांवरील नागरिकांची रक्तदाब मधुमेव आरोग्य तपासणी करून औषधे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी माझं गाव आरोग्य संपन्न गाव या आभियानाबद्दल डॉ. यशवंत नरवडे यानी पूर्ण माहिती सागून या अभियानात ग्राम पंचायतीने उस्फूर्तपणे सहभाग घेऊन आरोग्य संपन्न गाव ठेवण्याचा प्रयत्न करावा असे अवाहन केले.
या वेळी आरोग्य सेवक हवालदार राज्जबली आशा कार्यकर्ती वाघमारे ताई,सामाजिक कार्यकर्ते जयभिम वाघमारे, महादेव मोरे, श्रीकांत स्वामी सह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी
अनिता साळूंके,जयश्री नागमोडे, कमाबाई वाघमारे, सुरेखा नागमोडे सह गावातील एकून ४५ व्यकींची आरोग्य तपासणी करण्यात आली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india