Best News Portal Development Company In India

जळकोट शिवारात हिंस्र प्राण्याच्या हल्यात ८० शेळ्या नि मेंढ्यांच्या मृत्यू !

जळकोट शिवारात हिंस्र प्राण्याच्या हल्यात ८० शेळ्या नि मेंढ्यांच्या मृत्यू
– – – – – – – – – – – – – – – – – – – –
मेंढपाळाचे लाखो रुपयाचे नुकसान
– – – – – – – – – – – – – – – – – – – –
तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी आर्थिक साह्य देण्याचे दिले आश्वासन
– – – – – – – – – – – – – – – – – – – –
जळकोट (अरुण लोखंडे ) तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील शिवारात हिंस्र प्राण्यांच्या प्राणघातक हल्यात ८० मेढरं आणि शेळ्या मरण पावल्या असून पशुपालकांचे लाखो रूपयाचे नुकसान झाले असून पशुपालकनि केली मदतीची मागणी .
याबाबत प्राप्त माहिती अशी की जळकोट येथील शेतकरी संतोष दिलीप सुरवसे याची जळकोट शिवारात असलेली शेत जमीन गट नंबर ६३६ मध्ये मेंढरं बसविले होते दर वर्षी बरेच शेतकरी उन्हाळ्यात आपल्या शेतात मेंढरं बसवितात कारण की , शेतीला शेळ्या मेंढ्या यांच्या लेंडी खतामुळे शेतीत चांगल्या पद्धतीचे पिक येवून उत्पादनात वाढ होते म्हणून पूर्वी परंपरागत मेंढ्या शेतात बसविल्या जातात त्या प्रमाणे सुरवसे यांनी त्यांच्या शेतात मेंढ्या बसविल्या होत्या पण दिनांक २७ एप्रिल च्या रात्री पशुपालकांना रात्री झोप लागल्यानंतर हिंस्र प्राण्यांनी मेंढ्या च्या कळपात घुसून मेंढ्या वर हल्ला केला नुसते पोट फोडून व गळ्यावर हल्ला करून बघता बघता ८० शेळ्या व मेंढया खल्लास केल्या यामध्ये दयानंद विश्वानाथ भोगे मनोज अशोक कदम बालाजी हरिबा सोनटक्के प्रभाकर भिमराव सुरवसे दत्ता माणिक सोनटक्के राजेंद्र सदू भोगे हरिबा पेमा सोनटक्के याच्या शेळ्या मेंढ्या दगावल्या आहेत .सदरची बातमी समजाताच पंचायत समीतीचे सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आशिष सोनटक्के व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेश सोनटक्के हे पिता पुत्र घटना स्थळी जावून पाहाणी केली . सदरची घटना आशिष सोनटक्के यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील याना भ्रंमन ध्वनी वरून सागितली असता त्यांनी संमधीत पशूपालकांशी संर्पक साधून त्याच्याशी संवाद साधत आपणास सर्व ती मदत केली जाईल आपण खचून जावू नका आपणास शासकीय अनुदान सरकारकडून मदत व खास करून पशूउद्योजक ही शासनाने नवीन योजना काढली आहे त्या योजने मार्फत आपणास मदत केली जाईल अशी ग्वाही आमदार साहेब यांनी दिल्याने पशुपालकांनी समाधान व्यक्त केले आहे व संबंधित यंत्रणेस तात्काळ प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहे . सदरच्या घटनेचा वनविभागाचे कोकाटे सोहेब व महसुल विभागाच्या वत्तीने पंचनामा करण्यात आला .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india