Best News Portal Development Company In India

नळदुर्ग येथे डॉ. बाबासाहेब आबेडकर जयंती मिरवणूक उत्साहात : जयभिम च्या जयघोषाने नळदुर्ग शहर दणानले !

नळदुर्ग येथे डॉ. बाबासाहेब आबेडकर जयंती मिरवणूक उत्साहात : जयभिम च्या जयघोषाने नळदुर्ग शहर दणानले
—————————————————-
नळदुर्ग (एस. के. गायकवाड ):
आंबेडकरी चळवळीचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे सोलापूर ते हैदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर असलेले नळदुर्ग तालुका तुळजापूर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्साहाची सांगता भव्य मिरवणुकीने करण्यात आली. असून या प्रसंगी जय भिम च्या जय घोषाने नळदुर्ग शहर दणानून गेले होते.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव कमिटी नळदुर्गच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेवटची शहरातील मुख्य बाजारपेठेतून भव्य मिरवणूक काढून या जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली.प्रारंभी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून येथिल बुद्ध विहारा पासून कुरेशी गल्ली,किल्ला गेट, क्रांती चौक,चावडी चौकभवानी चौक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक ते बौध्द नगर, भिम नगर मार्गे डॉल्बीच्या निनादात फटाक्याची आशिष बाजीकरत जय भिम चा जयघोष करत डॉ. बाबासाहेबड आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.या मिरवनुकीमध्ये नळदुर्म शहरातील व परिसरातील सर्व पक्षिय सर्व धर्मिय आंबेडकरी आनूयायांची भिम सैनिकांची ,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india