Best News Portal Development Company In India

डॉ आंबेडकर यांच्या जयंतीवरील अनावश्यक खर्च टाळून नवजात शिशु बेबी किट, रूग्णांना फळे वाटप रिपाइं युवक तालुकाध्यक्ष शुभम कदम यांचा उपक्रम !

डॉ आंबेडकर यांच्या जयंतीवरील अनावश्यक खर्च टाळून

नवजात शिशु बेबी किट, रूग्णांना फळे वाटप

रिपाइं युवक तालुकाध्यक्ष शुभम कदम यांचा उपक्रम


तुळजापूर (प्रतिनिधी) महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा बसवेश्वर, तथागत गौतम बुद्ध राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून तुळजापूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने युवक तालुकाध्यक्ष शुभम कदम यांच्या महापुरुषांच्या विचारांची जयंती लोक कल्याणाची जयंती संकल्पनेतून जयंतीवरील अनावश्यक खर्च टाळून तुळजापूर उपजिल्हा रूग्णालयात नवजात शिशु यांना उपयोगाची बेबी किट, रूग्णांना फळे वाटप करून महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली.

 

तुळजापूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले युवक आघाडीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, महाराष्ट्र जाॅईन सेक्रेटरी राजाभाऊ ओव्हाळ,धाराशिव जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून महा मानवांच्या विचारांची जयंती साजरी व्हावी, लोककल्याणाची जयंती साजरी व्हावी या संकल्पनेतून जयंतीवरील अनावश्यक खर्च टाळून विविध सामाजिक उपक्रमातून जयंती साजरी केली जाते.
कै. साहेबराव हंगरगेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण मरळ, नगर परिषदेचे स्वच्छता निरिक्षक दत्तात्रय साळुंके यांचा सेवा निवृत्ती निमित्त सत्कार करून बेबी किट व फळांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. एडके,डॉ.राठोड,डॉ स्वामी डॉ. गडेकर, डॉ. हिराळे अधिसेविका स्वाती जाधव, अर्चना डोके, राहुल पवार,रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के,तालुकाउपाध्यक्ष किसन पांडगळे,ओ.बी.सी सेलचे शहराध्यक्ष लहु घोडके,लोकमान्य युवामंचचे अध्यक्ष शशिकांत मुळे, तालुका सचिव सुरेंद्र सुर्यवंशी,दिपक ओव्हाळ, विलास माळी, आदिंसह रिपाइंचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india