येणेगुर व सुंदरवाडी पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार
– येणेगुर ,सुंदरवाडी ग्रा.पं.पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे यश
उमरगा /लोहारा आदिनथ भालेराव.
तालुक्यातील येणेगुर व सुंदरवाडी ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयी उमेदवारांचा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विक्रमबापू बिराजदार,शहराध्यक्ष सुशील दळगडे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नेताजी कवठे यांच्या हस्ते दि . २९ रोजी सत्कार संपन्न झाला .
यावेळी येणेगुर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीमध्ये विजयी उमेदवार सौ अश्विनी सिद्धेश्वर हिप्परगे तर सुंदरवाडी ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार सुमन बाबुराव कुंभार ,अंजना महादेव पवार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा सुरेश दाजी बिराजदार ,युवकचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे ,जिल्हा उपाध्यक्ष भीमा स्वामी ,तालुकाध्यक्ष बाबा जाफरी , लोहारा तालुका अध्यक्ष सुनील साळुंखे ,युवक उपाध्यक्ष शमशोद्दीन जमादार ,यांनी शुभेच्छा दिल्या आहेत .यावेळी रमेश बिराजदार , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोहन शिंदे ,अप्पू हिप्परगे ,राम शिंदे ,प्रदीप कांबळे , फैय्याज पठाण ,नितीन सुरवसे ,महादेव पवार , बाबुराव कुंभार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .






