Best News Portal Development Company In India

आष्टा जहागीर येथे १मे महाराष्ट्र दिन विविध ठिकाणी विविध उपक्रमांनी साजरा.. !

आष्टा जहागीर येथे १मे महाराष्ट्र दिन विविध ठिकाणी विविध उपक्रमांनी साजरा.
तुरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.
तालुक्यातील आष्टा (जहागीर)येथे दि.१ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून केंद्रीय प्रथमीक शाळा येथे सकाळी ८:३० वाजता उपसरपंच बापुराव मोहनराव गायकवाड यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले व तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
९ वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून सरपंच सतिष जमादार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले, तर उपसरपंच बापुराव मोहनराव गायकवाड यांच्या हस्ते तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले,तदनंतर ९:३० वाजता पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी.२ येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ कांबळे यांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करण्यात आले व तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण सरपंच सतिष सोपान जमादार यांच्या हस्ते करुन राष्ट्र गीताने सलामी देण्यात आली.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे जय जय महाराष्ट्र माझा/गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत गायनाचे सादरीकरण करून उपस्थितीत मान्यवरांचे मने जिंकली.
यावेळी, पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ.महेबुब शेख ,केंद्रीय मुख्याध्यापक संजीव पवार, सह शिक्षक राम वाडीकर, सहशिक्षीका, एम.एस्.ईंगोले,एम.टी.मोरे,ग्रामपंचायत सदस्या अर्चना सुर्यवंशी, अरोग्य उपकेंद्र मळगी येथील आशा पर्यवेक्षिका एस.एम.नंदगुरे,अंगणवाडी कार्यकर्ती सविता गायकवाड,सुनिता उर्फ आल्का जाधव ,मदतनीस ज्योती कुलकर्णी,शिल्पा मोरे,आशा कार्यकर्ती रोहिणी नंदकुमार जाधव ,ग्रामपंचायत संगणक चालक बालाजी कांबळे,शिपाई ज्ञानेश्वर गायकवाड, हणुमंत गायकवाड, अदिंची उपस्थिती होती.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत ईयत्ता १ ली ते ७ वी च्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे मान्यवरांच्या हस्ते वापप करण्यात आले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india