राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गट )उद्योग विभागाच्या मुंबई उपाध्यक्षपदी उदयराज तळेकर, तर पश्चिम अध्यक्षपदी सुजित गुप्ता यांची नियुक्ती
मुंबई:
महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमा यांचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग विभाग, मुंबई व ठाणे जिल्हा कार्यालयात उत्साहात सोहळा पार पडला. या मंगल प्रसंगी पक्षाच्या उद्योग विभागाला अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाच्या दोन नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
यामध्ये मुंबई विभागाच्या उपाध्यक्षपदी उदयराज उर्फ राजू सिताराम तळेकर आणि मुंबई पश्चिम अध्यक्ष म्हणून सुजित रामप्रकाश गुप्ता यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली.
दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा
पक्षाच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला मुंबई विभाग अध्यक्ष श्री. अश्विन केळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुंबई विभाग सचिव प्रा. दिपक जाधव, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष शाम नाना चौगले, ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर मराठे, कार्यालय प्रशासन कार्यकारी भूमिका शिरोडकर, कार्यालय प्रमुख रविंद्र शिंदे आणि पत्रकार विलास चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध’
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उदयराज तळेकर आणि सुजित गुप्ता यांनी सांगितले की,
“पक्षाने आमच्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही. आपल्या विभागामध्ये पूर्ण निष्ठेने आणि जोमाने काम करून जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न राहील. उद्योग विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
या नियुक्तीमुळे मुंबई आणि उपनगरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्योग विभागाच्या कार्याला मोठी गती मिळणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.







