एस. टी. कामगार संघटना उमरगा आगार यांच्यातर्फे महाराष्ट्र कामगार दिनानिमित्त उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार .
उमरगा आगार अध्यक्ष संजय कुंभार ,सचिव महादेव घोगरे यांची संकल्पना, संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव उपक्रम, कर्मचाऱ्यात आनंदाचे वातावरण .
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कामगार दिनानिमित्त उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार करणारी धाराशिव विभागातील उमरगा आगारातील एस.टी.कामगार संघटना एकमेव ठरली आहे.
गणेश चतुर्थी, कर्मचाऱ्यांचा सत्कार, सेवानिवृत्ती सत्कार,असे अनेक उपक्रम यापूर्वीही राबवले गेलेले आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन उमरगा आगारातील एस.टी.कामगार संघटना आगार अध्यक्ष संजय कुंभार व सचिव महादेव घोगरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असून कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष नूरसे व कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये पार पडला.यापुढे यापेक्षा मोठा कार्यक्रम आयोजीत करून कर्मचाऱ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देऊन त्यांचा सत्कार करू असे नवरत्न न्यूज रिपोर्टर यांच्याशी बोलताना माहिती दिली.
1 मे 2026 रोजी महाराष्ट्र कामगार दिनानिमित्त अकरा उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार एस.टी.कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आला. ज्यांची नावाची यादी खालील प्रमाणे : 1.रामचंद्र सूर्यवंशी – यांत्रिक, 2.कालिदास सास्तुरे – वाहक, 3.सूरज कोरे – लिपिक, 4.चंद्रकांत कांबळे व पोतदार – यांत्रिक, 5.तानाजी पवार – चालक, 6.महेश कल्याणपाड – लिपिक, 7.घाटे – वाहक, 8.निवृत्ती गायकवाड – चालक, 9. अरविंद बेले – लिपिक, 10. सौ.वर्षा घाटे – यांत्रिक यांचा सत्कार फेटा व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी निवृत्त कर्मचारी बिद्री,एस.टी.बँकेचे माजी संचालक जयवंत जाधव साहेब,आगारप्रमुख प्रसाद कुलकर्णी साहेब व तसेच प्रशासकीय कर्मचारी, चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, महिला कर्मचारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कालिदास जाधव तर समारोप बालाजी पाटील यांनी केले.








