Best News Portal Development Company In India

तुळजापूर येथे बुद्ध जयंती, कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न !

तुळजापूर येथे बुद्ध जयंती, कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न
————————————————-
तुळजापूर(प्रतिनिधी ):
तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती व कामगार दिन महाराष्ट्र दिना निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आज दिनांक १ मे २o२६ रोजी तुळजापूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोर तथागत गौतम बुद्ध यांची जयंती,कामगार दिन व महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
प्रारंभी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे मराठवाडा विभाग उपाध्यक्ष तानाजी कदम शहराध्यक्ष अरुण कदम तालुका अध्यक्ष प्रकाश कदम सह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी रिपब्लिकन पक्षाच्या मराठवाडा उपाध्यक्ष तानाजी कदम तालुकाध्यक्ष प्रकाश कदम शहराध्यक्ष अरुण कदम युवक शहराध्यक्ष अमोल कदम कामगार आघाडी तालुकाध्यक्ष आप्पा कदम कामगार आघाडी शहराध्यक्ष रवि वाघमारे शंकर शिंदे बाळासाहेब ढवळे तानाजी डावरे दीपक कदम पिंटू गायकवाड जयदेव कदम राजेंद्र कदम हनुमंत सोनवणे शंकर देवकर विजय कांबळे इत्यादी सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india