Best News Portal Development Company In India

भक्तीचा महिमा! पुण्याच्या भाविकाकडून श्री तुळजाभवानी देवीला अर्धा किलो चांदीचे अलंकार अर्पण !

भक्तीचा महिमा! पुण्याच्या भाविकाकडून श्री तुळजाभवानी देवीला अर्धा किलो चांदीचे अलंकार अर्पण !
​तुळजापूर :-महाराष्ट्राची कुलस्वामिनी जगतजननी आई तुळजाभवानीच्या चरणी ‘आई राजा उधो-उधो’च्या जयघोषात आणि भक्तीमय वातावरणात आज श्री क्षेत्र तुळजापूर येथे एका भाविकाने आपल्या आराध्य दैवताला मौल्यवान दागिन्यांचा नजराणा पेश केला. भक्ती शक्ती आणि दातृत्वाचा त्रिवेणी संगम पाहावयास मिळाला . पुण्यातील पिंपळे गुरव येथील रहिवासी श्री. दिगंबर बसवंतराव बिरादार यांनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी अर्धा किलो वजनाचे चांदीचे वाहिक (अलंकार) अर्पण केले आहे.
​दिगंबर बिरादार हे आज आई साहेबांच्या दर्शनासाठी तुळजापुरात आले होते. दर्शनानंतर त्यांनी अत्यंत श्रद्धेने देवीसाठी आणलेले दागिने मंदिर प्रशासनाकडे सुपूर्द केले. यामध्ये प्रामुख्याने
​चांदीचा आकर्षक मुकुट, ​पारंपारिक चांदीचे कानातील मासे इत्यादी साज भक्ती भावाने आणि अत्यंत श्रद्धेने अर्पण करण्यात आले.
​भक्ताच्या या दातृत्वाची दखल घेत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने दिगंबर बिरादार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंदिर परिसरातील मान्यवर आणि कर्मचारी उपस्थित होते.
​”देवीवरील अढळ श्रद्धेपोटी हे अलंकार अर्पण करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य समजतो,” अशी भावना यावेळी बिरादार यांनी व्यक्त केली.
​याप्रसंगी विकास वाणी, महेश गंजे, सूरज घुले यांच्यासह मंदिर संस्थानचे कर्मचारी आणि इतर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india