Best News Portal Development Company In India

उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; भरचौकात कोयता नाचवणाऱ्या लातूरच्या तरुणाला अटक !

उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; भरचौकात कोयता नाचवणाऱ्या लातूरच्या तरुणाला अटक !
तुळजापूर प्रतिनिधी:-उमरगा शहरातील वर्दळीच्या अण्णाभाऊ साठे चौकात हातात धारदार कोयता बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एका इसमाला उमरगा पोलिसांनी रंगेहात पकडले. जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आले आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार दिनांक २ मे २०२६ रोजी दुपारी १:१० वाजेच्या सुमारास उमरगा येथील मुख्य अण्णाभाऊ साठे चौकात एक इसम संशयास्पद रित्या वावरत होता. त्याच्याजवळ लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा स्वरूपाचा एक लोखंडी कोयता असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
​पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव संतोष शिवाजी धुमाळ (वय ४४ वर्ष) असून, तो मिरगन हाळी, ता. निलंगा, जि. लातूर येथील रहिवासी आहे. कोणत्याही वैध परवान्याशिवाय त्याने हे शस्त्र आपल्याकडे बाळगले होते.
​धाराशिवच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे उमरगा पोलीस ठाण्यातील पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आणि त्याच्याकडील कोयता जप्त केला.
​याप्रकरणी पोलीस नाईक यासीन नसीर सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी संतोष धुमाळ विरुद्ध खालील कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला.
​भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३
​शस्त्र कायदा (Arms Act) कलम ४, २५
​महाराष्ट्र पोलीस कायदा (MPA) कलम १३५
​सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना शस्त्र बाळगणे आणि शांतता भंग करणे यावर उमरगा पोलिसांची करडी नजर असून, अशा गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. विनापरवाना शस्त्र बाळगणे कायद्याने गुन्हा आहे सामाजिक समतोल राखून कुणीही कायदा हातात घेऊ नये.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india