Best News Portal Development Company In India

जवळगा (मेसाई)येथे सेवानिवृत्त आर्मी सैनिकाचा सत्कार !

जवळगा (मेसाई)येथे सेवानिवृत्त आर्मी सैनिकाचा सत्कार !
————————————————–
नळदुर्ग (एस. के. गायकवाड ):
तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई येथील सुपुत्र जगन्नाथ कदम यांचा आर्मी सैनिक म्हणून देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल येथील ग्रामस्थांच्या वतीने येथे सत्कार करण्यात आला.
. जगन्नाथ कदम हे भारत सरकारच्या आर्मी सैन्य दलात भरती होऊन देशातील विविध ठिकाणी आर्मी सैनिक म्हणून देशसेवा करून नुकतेच ते सेवानिवृत्त झाले आहेत.
. त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल येथील ग्रामस्थांच्या वतीने मानाचा फेटा,पुषहार,पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करून त्यांच्या भावी आयुष्यातील जीवनाला ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी रिपाइ (आठवले) चे धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब म्हस्के,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, दादासाहेब चौधरी,सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब इंगळे, आप्पाराव लोखंडे,नागनाथ नरवडे, रामचंद्र नरवडे, रजनीकांत भुसारे, मनोहर मस्के, राजेंद्र वाघ, सह ग्रामस्थ उपस्थित होते. देश सेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या लढवय्या सैनिकाचा सत्कार करण्याचा मान गावकऱ्यास मिळाल्यामुळे संपूर्ण गावात व नागरिकात आनंदाचे वातावरण होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india