आष्टा( जहागीर)येथील संतयोगी दामोदर मठाचे मठाधिपती श्री.श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर अवधुतपुरीजी बाबा याचा सुवर्ण महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा विविध प्रकारच्या उपक्रमाने साजरा.
तुरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.
तालुक्यातील आष्टा जहागीर येथे( दि.१०) रोजी संतयोगी दामोदर मठसंस्थानचे मठाधिपती श्री.श्री.श्री.१००८ महमंडलेश्वर अवधुतपुरीजी भाबा यांचा सुवर्ण महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा महंत, संत,भाविक भक्त गणाच्या सानिध्यात थाटामाटात नामघोषाच्या जयजयकारात (जनमदिन) क्रतज्ञता सोहळा साजरा करण्यात आला.
रविवार (दि१०)रोजी पहाटे४ते ६काकडा आरती भजन ६ते८रुद्राभिषेक,पंचामृत स्नान व अरती,८वा.अल्पोपहार,९ते१०बाबाच्या सानिध्यात नापजप व भजन संकिर्तन,दुपारी२वा.भक्तांच्या द्वारा भेटवस्तू, सत्कार, शुभेच्छा व उपस्थित विद्वतजनांचे आशिर्वचन व दुपारी३ते ५ श्री ह.भ.प.वेदांताचार्य भगवानजी महाराज जंगले शास्त्री(रामकृष्ण अश्रम गोणेगांव,नेवासा)यांची हरीकिर्तन सेवा संपन्न करण्यात आली.
तदनंतर भव्य दिव्य रथोत्सव व ८६किलो खडीसाखर मोहन जवव यांच्या वतिने तर ८६ किलो साखर तुला ,दिनकर पटिल पडसगाव यांच्या वतीने समारंभ साजरा करण्यात आला.
यावेळी श्री.श्री.श्री.महामंडलेश्वर अवधुतपुरीजी बाबा यांचे सद्गुरू परिव्राजकाचार्य श्री.श्री.श्री.१००८ स्वामी गोरक्षनाथ बाबा रामलिंगेश्वर संस्थांन लांबोटा, भगवान शास्त्री गोणेगाव ,नेवासा,हरी लवटे गुरुजी महाराज, अचलबेट देवस्थान, महंत तेजसनाथ,ब्रम्हानंद गीरी,महंत देवपुरी, दिपक महाराज, प्रशांत घोडके महाराज, प्रदिप महाराज, दादा महाराज, विरनाथ काळे महाराज, भिम महाराज,गर्जे महाराज माळेगाव, भिम महाराज, मुळज,दयानंद महाराज, कुलदीप महाराज मळगी,महेश महाराज हिप्परगा, जिल्हा परिषद उपाध्यक्षा धाराशिव उषाताई रविंद्र गायकवाड, कीरण रवींद्र गायकवाड नगराध्यक्ष उमरगा, अर्चनाताई युवराज जाधव जिल्हा परिषद सदस्य धाराशिव, माजी पंचायत समिती उपसभापती युवराज जाधव, उपसरपंच बापुराव मोहनराव गायकवाड ,माजी उपसरपंच राधाताई मोहनराव गायकवाड, आष्टा (जहागीर), पोलिस पाटिल महेश जाधव, महेश आष्टे, अदि मान्यवारांची प्रमुख उपस्थिती होती.
रथोत्सव मीरवणुकीदरम्यान ५० भगवा पताका,५० महिलांच्या डोक्यावर तुळशीचे व्रंदावन,५० कलश,५० टाळकरी,५० टाळकरी,५० विणेकरी,५० पखवाज वादकक, नेमण्यात आल्याने मीरवणुकीत खास अकर्षक ठरत होता.नामघोषाच्या गजराने गाव परीसर दुमदुमून गेला होता.
महामंडलेश्वर १००८ अवधुतपुरीजी बाबा यांच्यासाठी ६५ भोग भोजनाची व्वस्था व भाविकभक्तांना महाप्रसाद भोजनाची व्यवस्था पंचक्रोशीतील भाविकभक्तांच्या व ग्रामस्थांच्या वतिने आर्थसह्याने करण्यात आली.
यावेळी पंचक्रोशीतील भाविकभक्तासमवेत समस्त ग्रामस्थांना भोजन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.







