Best News Portal Development Company In India

अणदूर येथील अस्थी बौध्दविहाराचे काम शासनाच्या दिरंगाईमुळे रखडले!

अणदूर येथील अस्थी बौध्दविहाराचे काम शासनाच्या दिरंगाईमुळे रखडले
—————————————————–
नळदुर्ग (एस. के. गायकवाड ):
अणदूर तालुका तुळजापूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अस्थी बौद्ध विहारास ” क ” दर्जा मिळालेला असून या विहाराच्या विकास कामासाठी खासदार फंडातून ५० लाख रुपये मिळूनही केवळ शासनाच्या दिरंणाईमुळे अद्याप हे काम प्रलंबित आहे.
. तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अस्थीवीहारास २०१६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण तिर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत क दर्जा प्राप्त झाला असुन अस्थीविहाराचे काम प्रलंबीत आहे, खासदार फंडातून पन्नास लाख रुपये निधी मंजूर असुनही शासनाकडून या कामी दिरंगाई होत आहे
मराठवाड्यात फक्त दोनच ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिवीहार आहेत,उमरगा तालुक्यातील सालेगावचे अस्थीविहार कोट्यावधी निधीतुन पुर्णत्वास आले आहे पण अणदूर येथील अस्थिविहाराची अजून सुरुवातही झालेली नाही, येथील अस्थीविहाराची दुरावस्था झाली असुन याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे
जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनी ऑगस्ट २०२५ ला आपल्या खासदार फंडातून पन्नास लाख रुपये मंजूर केले असुन याबाबत जिल्हाधिकारी यांना क वर्ग तिर्थक्षेत्र कामाला मंजुरी द्यावी असे कळवले आहे , संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली, परंतु पुढील कार्यवाही काही होत असल्याचे दिसत नाही एप्रिल महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त किंवा बुध्द जयंती निमित्त अस्थीविहाचा शुभारंभ होईल अशी अणदूरकरांना अपेक्षा होती,पण कुठलीच हालचाल दिसत नाही, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्थेच्या वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे अणदूर येथे भव्य दिव्य अस्ति विहार उभे राहणार आहे, तेंव्हा प्रशासनाने त्वरीत अणदूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अस्थी विहाराच्या कामाचा शुभारंभ करुन अस्थीवीहार पुर्णत्वास न्यावे अशी मागणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे संस्थेचे अध्यक्ष मधुकर कांबळे,हरीभाऊ बनसोडे, नागनाथ कांबळे, मनोहर बनसोडे, शामराव कांबळे,विद्याधर सुर्वे,आप्पाराव कांबळे,गोरख कांबळे,कल्पना सुर्यवंशी, भिमराव कांबळे यांनी केली आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india