शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दिली व्यसनमुक्ती ची शपथ
नळदुर्ग (एस. के. गायकवाड ):
तुळजापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) मध्ये दिनांक 11 मे रोजी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे धाराशिव जिल्हा संघटक तथा परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग चे संस्थापक सचिव मारुती बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती ची शपथ दिली. आणि त्यांना मार्गदर्शन केले. आजचा युवक व्यसनाचे आहारी जात आहे.त्याला व्यसनापासून परावृत्त करणे काळाची गरज आहे.असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्राचार्य एम.एस.बिरादार,सुजित नाईकवाडी, सुरेश सूर्यवंशी, सह विद्यार्थी, विद्यार्थिनी व कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना मारुती बनसोडे म्हणाले की दारू,ड्रग्ज या नशे बरोबर इंटरनेट ची पण नशा वाढत आहे सोशल मीडियाचा गरजेपेक्षा जास्त वापर केला जात आहे आता यासाठी ही तरुणाई मध्ये प्रबोधन करणे आवश्यक आसून तरुणानेही गरजेपेक्षा जास्त इंटरनेटचा वापर टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे यासाठी समाजावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीने व्यसनमुक्तीसाठी पुढे आले पाहिजे आणि एक सुसंस्कृत व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी प्रयत्न होणे महत्त्वाचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी व मान्यवराने सामुदायिक रित्या व्यसनमुक्तीची शपथ घेतली.







