Best News Portal Development Company In India

संवादातून समन्वयाकडे:उमरगा-लोहारा मतदारसंघाच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा!

*संवादातून समन्वयाकडे…*

*उमरगा-लोहारा मतदारसंघाच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केलेल्या अपेक्षा, नाराजी आणि सूचनांची दखल घेत मा. आमदार प्रवीण स्वामी यांनी काल त्यांच्या कार्यालयात बोलावून घेत सविस्तर संवाद साधला.

याप्रसंगी राज्यातील काही महत्त्वाचे विषय, मतदारसंघातील विविध समस्या, महाविकास आघाडीतील घटक पक्ष, समविचारी पक्ष-संघटना व व्यक्तींना विश्वासात घेऊन अधिक सर्वसमावेशक निर्णय प्रक्रिया राबवण्याची आवश्यकता, नागरिक व कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी वाढवावयाचा संवाद, पक्ष विस्तार, स्थानिक प्रश्नांवरील भूमिका अशा अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

आमदार महोदयांनी चर्चेदरम्यान अनेक मुद्दे गांभीर्याने नोंद करून घेतले असून पुढील काळात अधिक समन्वय, संवाद आणि हस्तक्षेप वाढवण्याबाबत सकारात्मकता दर्शवली.

मी याद्वारे मतदारसंघातील नागरिक, कार्यकर्ते, समविचारी व्यक्ती आणि विविध क्षेत्रातील लोकांना आवाहन करीत आहे की कुठल्याही समस्या, तक्रारी, सूचना किंवा महत्त्वाचे मुद्दे असतील तर ते आमच्यापर्यंत अथवा थेट आमदार महोदयांपर्यंत पोहोचवावेत.

मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी रचनात्मक भूमिका, सततचा आढावा आणि आवश्यक त्या प्रत्येक विषयावर पाठपुरावा करण्यासाठी कटिबद्ध राहू.

कारण शेवटी प्रश्न व्यक्तींचा नाही;
प्रश्न उमरगा-लोहारा मतदारसंघाच्या भविष्याचा आहे.

© अँड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india