Best News Portal Development Company In India

नांदेड जिल्हा अभियोक्ता संघाच्या निवडणुकीत अँड.यदुपत अर्धापूरकर यांचा तब्बल २९६ मताधिक्याने अध्यक्षपदी विजय!

नांदेड जिल्हा अभियोक्ता संघाच्या निवडणुकीत अँड.यदुपत अर्धापूरकर यांचा तब्बल २९६ मताधिक्याने अध्यक्षपदी विजय

अभियोक्ता एकता पॅनलने प्रचंड बहुमताने ऐतिहासिक विजयाने मारली बाजी

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

नांदेड जिल्हा अभियोक्ता संघटनेच्या २०२६-२८ च्या कार्यकारिणीच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या लढतीनंतर अखेर निकाल जाहीर झाला असून अध्यक्षपदी अँड. यदुपत श्यामसुंदरराव देशमुख अर्धापूरकर यांनी दणदणीत विजय मिळवला.एकूण १७८२ मतांपैकी अर्धापूरकर यांना ९५७ मते मिळाली, तर शैलेश देशमुख यांना ६६१ आणि जगजीवन भेदे यांना १४६ मते मिळाली.अध्यक्ष पदामध्ये अँड. यदुपत अर्धापूरकर हे तब्बल २९६ च्या मताधिक्याने विजयी होवून त्यांनी नांदेड अभियोक्ता संघाच्या निवडणुकीत नवा इतिहास घडवला आहे.उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या लढतीत अँड.संगमेश्वर देलमडे यांनी ७२८ मते मिळवत विजय संपादन करून त्यांच्या विरोधातअँड.महिंद वावळे यांना ५१९ तर अँड.निरज भोसीकर यांना ४५६ मते मिळाली. महिला उपाध्यक्ष पदावर अँड. दीपाली डोंनगांवकर यांनी ७५९ मतांसह विजय मिळवला तर अँड. विजयमाला मनवर यांना ६१५ व अँड.ज्योती सूर्यवंशी यांना ३५० मते मिळाली.सचिव पदासाठी अँड.कपिल पाटील यांनी ७०९ मते मिळवत विजय मिळवला तर अँड. ज्ञानेश्वर देशमुख यांना ३९५,अँड रविंद्र पाटील यांना ३३० आणि अँड.मंगेश वाघमारे यांना २९९ मते मिळाली.सहसचिव पदावर अँड. जगदीश हाके यांनी ६६४ मतांसह विजय संपादन केला तर अँड. जावेद पठाण यांना ४६८ अँड. चंद्रमुनी सोनसळे यांना ३२४ व अँड.तहूर पठाण यांना २५७ मते मिळाली.महिला सहसचिव पदावर अँड.सुजाता बगाटे यांनी ७७८ मते मिळवत विजय मिळवला तर अँड.वृशाली जोशी यांना ३५८, अँड.वनिता बोईनवाड यांना ३३२ व अँड.नगमा सिद्दीकी यांना २४५ मते मिळाली.कोषाध्यक्ष पदावर अँड. मंगेश जामनिक यांनी ६९८ मते मिळवत विजय मिळवला तर अँड. फेरोज पठाण यांना ४७५,अँड. विष्णू पाटील यांना ३९३ व अँड. शिवकांत किरवले यांना १४७ मते मिळाली.विशेष सहाय्यक पदासाठी अँड.प्रदीप राठोड यांनी ५७३ मते मिळवत विजय मिळवला तर अँड. जयेश पाटील यांना ५४३,अँड. गौतम किन्नीकर यांना ४१० व अँड गणेश जाधव यांना १८३ मते मिळाली.सदस्य पदी विजयी झालेले उमेदवार अँड.पवार मुक्ताई नारायणराव ९१२ मतेअँड.गावंडे बाबू धर्माजी ८३८ मते,अँड. मठवाले रामसिंघ पुरणसिंघ ७९२ मते,अँड.पुंडगे रिना सतीश ७९२ मते,अँड.हटकर प्रिती ७६३ मते,
अँड.बोकारे कार्तिक नितीनराव ७१९ मते,अँड.येरेकर सुमेध बळीराम ७१९ मते,अँड बडो उषा सुरेशराव ७१२ मते,अँड..हटकर सटवाजी व्यंकटराव ६७९ मते,अँड.. सोलगे (पाटील) गंगासागर ६७३ मते
अँड राठोड संकेत दिलीपराव ६६० मते अशी असून निवडणुकीची मतमोजणी तब्बल ७२ फेऱ्यांनंतर पूर्ण झाली व निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके,ढोल,ताशांचा जल्लोष करत अभिनंदनाचा वर्षाव केला.नांदेड जिल्हा अभियोक्ता संघाच्या निवडणुकीत अँड.यदुपत अर्धापूरकर यांचा तब्बल २९६ मताधिक्याने अध्यक्षपदी विजय झाल्याने वकिल संघाच्या निवडणूकीत हा एक ऐतिहासिक रेकाॅर्ड ब्रेक झाला असून अभियोक्ता एकता पॅनलने प्रचंड बहुमताने ऐतिहासिक विजयाची बाजी मारली असून या संपूर्ण पॅनलचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून पुढील नाविन्यपूर्ण उपक्रम व कार्यास खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india