इंदापुरात घरफोडी; २ लाख २१ हजारांचा ऐवज लंपास!वाशी पोलिसांत अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल.
तुळजापूर प्रतिनिधी:- धाराशिव जिल्ह्यातील
वाशी तालुक्यातील इंदापूर येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण २ लाख २१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश कल्याण पारडे (वय ३७ वर्ष, रा. इंदापूर, ता. वाशी, जि. धाराशिव) यांचे राहते घर दि. १५ मे २०२६ रोजी रात्री १०:०० ते दि. १६ मे २०२६ रोजी पहाटे ५:०० वाजण्याच्या सुमारास बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि ५३,७०० रुपयांची रोख रक्कम, असा एकूण २,२१,३०० रुपयांचा ऐवज लंपास केला.
वाशी पोलिसांत गुन्हा दाखल. सदर घटनेने गावात एकच खळबळ माजलेली आहे.
चोरांना कठोरात कठोर शासन होण्याची मागणी जोर धरत आहे. हा चोरीचा प्रकार १६ मे रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आला. यानंतर सतीश पारडे यांनी तातडीने वाशी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून (FIR) वाशी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये मालमत्तेविरुद्धचा गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत. भुरट्या चोरांना लवकरात लवकर अटक व्हावी अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. अनुचित प्रकार लक्षात येतात पोलिसांची संपर्क साधावा व नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.






