Best News Portal Development Company In India

जून २०२६ महिन्यासाठी श्री तुळजाभवानी देवीजींच्या “सिंहासन पूजेची” ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे !

जून २०२६ महिन्यासाठी श्री तुळजाभवानी देवीजींच्या “सिंहासन पूजेची” ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे !
तुळजापूर प्रतिनिधी :- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या चरणी राजरोसपणे भक्तगण मोठ्या संख्येने दर्शनासाठी व पुजा-अर्चना विधी करण्यासाठी येत असतात . त्यांना विना अडथळा पूजा विधि मनोभावे करता यावा म्हणून मंदिर समितीने देवीच्या सिंहासन पूजेची ऑनलाईन प्रक्रिया पुढील प्रमाणे सुरू केलेली आहे .      सदर प्रक्रियेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहील :-
ऑनलाइन नोंदणी सुरू : १९ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वा.
ऑनलाइन नोंदणी समाप्त : २४ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वा.
पहिली निवड यादी जाहीर : २७ मे २०२६ रोजी सकाळी ११.०० वा.
पहिल्या फेरीचे शुल्क भरण्याची अंतिम मुदत : २८ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वा.
यानंतर उपलब्धतेनुसार दुसरी व तिसरी निवड यादी जाहीर करण्यात येईल.
द्वितीय व तृतीय फेरीची निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे राबविण्यात येईल :
• द्वितीय फेरी निवड यादी प्रसिद्ध : २८ मे २०२६ रोजी सकाळी ११:०० वा.
• द्वितीय फेरी शुल्क भरण्याची अंतिम मुदत : २९ मे २०२६ रोजी सकाळी १०:०० वा.
• तृतीय फेरी निवड यादी प्रसिद्ध : २९ मे २०२६ रोजी सकाळी ११:०० वा.
• तृतीय फेरी शुल्क भरण्याची अंतिम मुदत : ३० मे २०२६ रोजी सकाळी १०:०० वा.
भाविकांनी नोंदणी व शुल्क भरण्याची प्रक्रिया दिलेल्या वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून करण्यात येत आहे.
नोंदणी व अधिक माहितीसाठी :
online.shrituljabhavani.org⁠

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india