संत श्रेष्ठ गोरोबाकाका यांच्या वाड्याचा वर्धापन दिन विविध प्रकारच्या उपक्रमांनी होणार साजरा.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
गोरोबाकाका यांच्या वाड्याचा वर्धापण दिन सोहळा दिनांक 10जून 2026, बुधवार रोजी सकाळी 9.00.ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमाचे विविध प्रकारचे आयोजन केलेले आहे. कार्यक्रमाची रुपरेषा पुढील प्रमाणे आहे(,१)श्री संत शिरोमणी गोरोबाकाकांच्या प्रतिमेचे पूजन व अभिषेक, (२)भजन व किर्तन, प्रवचन, (३)श्री संत शिरोमणी गोरोबाकाकांच्या वाड्यापासून (समाधी स्थळ )मंदिरापर्यंत धार्मिक दिंडीचे आयोजन, (४)दिंडी समाप्ती नंतर मंदिरा शेजारी सभागृहामध्ये महाप्रसाद, चे आयोजन.(५) सामाजिक उपक्रम सोहळा, असे कार्यक्रम आयोजित केले आहेत.या कार्यक्रमाचे आयोजक –सकल बीड ज़िल्हा कुंभार समाज आहे .तरी महाराष्ट्रतील तमाम कुंभार समाज बांधवानी श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या वाड्याच्या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आव्हान केले आहे.अखिल भारतीय प्रजापति कुंभकार महासंघ (रजि) दिल्ली, महाराष्ट्र कुंभार महासंघ, अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्था, महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संस्था,सकल कुंभार समाज विकास परिषद,श्री आर बी के प्रजापति, श्री सतीश कुंकळेकर, उमरग्याचे उद्योजक श्री नागनाथ अण्णा कुंभार, श्री अशोक प्रजापति,श्री प्रभू गोरे,श्री महादेव खटावकर, श्री दत्ता ढाळजकर,श्री सतीश दादा दरेकर, श्री रंगनाथ सूर्यवंशी,श्री अशोक सोनवणे, श्री श्याम शेठ राजे,श्री रमाकांत क्षीरसागर,श्री विनायक राऊत, श्री ज्ञानेश्वर भागवत,श्री मोहन जगदाळे,श्री संजय गात्ते,श्री नामदेव कुंभार,श्री रामदास कुंभार,श्री चन बस वायकर अदिनीं कार्यक्रमास भाविक भक्तांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी आग्रहीत केले आहे.






