Best News Portal Development Company In India

परीवर्तन चे मारुती बनसोडे यांना अंबरनाथ गौरव पुरस्कार जाहीर!

परीवर्तन चे मारुती बनसोडे यांना अंबरनाथ गौरव पुरस्कार जाहीर
नळदुर्ग प्रतिनिधी: परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग चे संस्थापक सचिव तथा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे धाराशिव जिल्हा संघटक आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त मारुती बनसोडे यांना यावर्षीचा अंबरनाथ टाईम्स कडून दिला जाणारा अंबरनाथ गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे
मारुती बनसोडे हे मूळचे बोरगाव ता. तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत गेली ३८ वर्षे सातत्याने सामाजिक कार्य करीत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सोबत १० वर्षे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. त्यानंतर परिवर्तन सामाजिक संस्था बोरगाव ची स्थापना १९९६ मध्ये केली त्या संस्थेकडून गेली ३० वर्षे काम करीत आहेत. पोतराज प्रथा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण, पाणी,ग्रामविकास, विधवा, निराधार,परित्यक्ता, एकल महिलांच्या प्रश्नावर ही ते काम करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आज पर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नेहरू युवा पुरस्कार, कल्पना चावला वैज्ञानिक पुरस्कार, कोकण दीप पुरस्कार, भिमरत्न पुरस्कार, भीमपुत्र आयडॉल 2025 पुरस्कार, संस्थात्मक लोकशाही मित्र पुरस्कार राज्य निवडणूक आयोगाकडून मिळाला आहे, महाराष्ट्र शासनाकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत. आता अंबरनाथ टाइम्स अंबरनाथ यांच्याकडून अंबरनाथ गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे हा पुरस्कार 23 मे 2019 रोजी अंबरनाथ येथे एका मोठ्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india