Best News Portal Development Company In India

“अवैध विदेशी दारुच्या बाटल्या जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई”34,600 रुपयाचा मुद्देमाल जप्त!

“अवैध विदेशी दारुच्या बाटल्या जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई”34,600 रुपयाचा मुद्देमाल जप्त!

तुळजापूर प्रतिनिधी :- दबंग धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची आणखी एक मोठी कारवाई अवैद्य मध्यविक्री करणारे चे धाबे दणाणले . स्थानिक गुन्हे शाखा- दि.21.05.2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणे, पाहिजे फरारी आरोपी शोध तसेच अवैध धंद्यावर कारवाई करीता सपोनि अमोल मोरे, पोह/बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, चालक पोकॉ दहीहांडे असे रवाना होवून पेट्रोलिंग करत येडशी शिवाजी महाराज चौकात येथे असताना पथकास गुप्त बातबीदारामार्फत माहिती मिळाली की, इनोव्हा कार क्र एमएच 15 बीएक्स 6820 मधून अवैध दारुची चोरटी  वाहतुक  करणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकाने नमुद ठिकाणी जावून थांब ले असतान 17.30 वा. सु.  येडशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पथकास कार येताना दिसली असता पथकाने  तिला थांबवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुभाष भिमराव/लाला काळे, वय 33 वर्षे, रा.कन्हेरवाडी ता. कळंब जि. धाराशिव असे सागिंतले. पथकाने कारची पाहणी केली असता एक इसम पाठीमागे शिटवर  बसलेला दिसला त्यास त्याचे नाव गाव विचारले असतान त्याने त्याचे नाव  दादा रामा काळे, वय 46 वर्षे, रा. जुना बस डेपो पारधी पिढी ता. जि. धाराशिव असे सागिंतले. त्यावर पथकाने पाठीमागील सिटची पाहणी केली असता विदेशी दारुचे बॉक्स दिसुन आले सदर इनोव्हा कार व मुद्देमाल असा एकुण 6, 34, 600 ₹ किंमतीचा जप्त करुन आरोपी नामे- सुभाष भिमराव काळे, दादा रामा काळे, यांचे विरुध्द म.दा.का कलम 65(ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद ईज्जपवार, सपोनि अमोल मोरे, पोह/ बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, चालक पोकॉ दहीहांडे यांचे पथकाने केली आहे.
अवैद्य धंद्याविरुद्ध स्थानिक गुन्हा शाखा धाराशिव पोलिसांनी मोहीम कडक केली आहे .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india