Best News Portal Development Company In India

धाराशिव बसस्थानक मधून मोटरसायकलसह चोणारे 2 आरोपी  स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड !

धाराशिव बसस्थानक मधून मोटरसायकलसह चोणारे 2 आरोपी  स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड !
तुळजापूर प्रतिनिधी:- स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी धाराशिव जिल्ह्यात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढलेले होते त्याविषयी अनेक तक्रारी दाखल झालेल्या होत्या. दि.22.05.2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने हे माला विषयी गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करीत पोलीस ठाणे धाराशिव शहर हद्दीत आले असता पथकास गोपनिय बातमीदारा मार्फत व तात्रिंक विषलेशनावरुन माहिती मिळाली की, दोन इसम अंबालना हॉटेलसमोरील चौकात चोरीच्या मोटरसायकलसह थांबलेले आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पथकान नमदु ठिकाणी 17.00 जावून बातमी मधील इसमांना ताब्यात घेतले.त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे- राजेश उर्फ राजा परमेश्वर बनसोडे, वय 21 वर्षे, रा. साठे नगर धाराशिव ता. जि. धाराशिव,अतिष हनुमंत सगर, वय 22 वर्शे, रा. भक्ती मार्ग सांगोला चौक झोपडपट्टी ता. पंढरपुर जि. सेालापूर ह.मु. गावसुद ता. जि. धाराशिव असे सांगितले. पथकाने नमुद  गाड्या बाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले आम्ही नमुद गाड्या चोरी केल्याची कबुली दिल्याने दि.22.05.2026 रोजी नमुद दोन आरोपीस ताब्यात घेवून त्यांचे कडून अंदाजे 60,000 ₹ किंमतीच्या चार मोटरसायकल जप्त केल्या. सदर आरोपीस चोरीच्या नमूद मोटारसाकलसह पुढील कारवाईस्तव आनंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या आदेशावरुन सपोनि श्री. अमोल मोरे, पोहेकॉ/ बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, राहुल नाईकवाडी,  चालक पोलीस अमंलदार- दहीहंडे TAW पोलीस अंमलदार बिराजदार यांच्या पथकाने केली आहे. असे जबरी गुन्हे उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे धाराशिव शाखेचा हातखंडा आहे.अशा कडक कारवायातूनच मोटरसायकल चोरांना धडकी भरेल व गुन्हे कमी होण्यास मदत होईल.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india