तुगाव येथील दलित बौद्ध तरुणास मारहाण प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करा रिपाइं ( आठवले ) ची मागणी
——————————————————-
नळदुर्ग ( एस. के. गायकवाड ):
उमरगा तालुक्यातील तुगाव येथील आंबेडकरी चळवळीतील एका तरुण युवा कार्यकर्त्यास तुगाव येथिल जातीयवादी गावगुंडानी संगणमत करून कट रचून जातीय द्वेशभावनेतून शेताकडे जबरदस्तीने घेवून गेले व त्यास लाथा बुक्कीने कंबर पट्ट्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केलेआहे.सरदर घाटना ही मानवतेला काळीमा फासणारी असून या मारहाण प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) लोहारा तालुका शाखेच्या वतीने जाहीर निषेध करत उमरगा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी याना लेखी निवेदन देण्यात आले.
. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उमरगा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) लोहारा तालुका शाखेच्या वतीने या संदर्भात एक लेखी निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की उमरगा तालुक्यातील तुगाव येथील आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते भालचंद्र कांबळे याला तुगाव येथील जातीवादी गावगुंड चांद फकीर,रोहित जोमदे,पंकज जोमदे, गहिनीनाथ जमदे संगणमताने कट करून त्याला जेवणाचे आमंत्रण देऊन दिशाभूल करून आष्टामोड येथील त्यांच्या शेताकडे नेऊन द्राक्षाच्या बागेतील खांबाला बांधून लाथा बुक्क्याने काठीने व कमर पट्टयाने जबरदस्त मारहाण करून गंभीर केल्याची मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले (लोहारा) तालुका शाखेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून या प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या संदर्भात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. .
.उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा यांना देण्यात आलेल्या निवेदनावर रिपाइं चे राज्य कार्यकारणी सदस्य एस.के..चेले, माजी समाज कल्याण सभापती हरिष डावरे, लोहारा तालुका अध्यक्ष काका भंडारे, रिपाइं चे अर्जुन मुके, संजय कांबळे, धिरज बेळंबकर, दगडू भोसले, प्रदिप भालेराव, खंडू भंडारे, रत्नदीप सोनकांबळे, उमरगा तालुका अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड सह कार्यकर्त्याच्या सह्या आहेत.
.






