औसा येथिल प्रशांत औटी यांची महाराष्ट्र शासनाच्या सचिव अभियांत्रिकी पदि निवड…..
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
औसा नगरीचे सुपुत्र तथा श्री मुक्तेश्वर विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रशांतजी शांतीरप्पा औटी यांना महाराष्ट्र शासनाने पदोन्नती देत सचिव तथा अभियांत्रिकी प्रमुख या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी सोपविल्याबद्दल, औसा पंचक्रोशीतील नागरिक आणि श्री मुक्तेश्वर महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या गौरवशाली सोहळ्याला माजी मंत्री तथा लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील हे उपस्थित राहून औटी साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. औसा नगरीने त्यांच्या रूपाने एक कर्तृत्ववान, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेला अधिकारी महाराष्ट्राला दिला आहे, ही संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब असल्याचे यावेळी बसवराज पाटील यांनी नमूद केले.
महाराष्ट्राच्या पायाभूत विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या आणि नुकत्याच उद्घाटन झालेल्या मुंबई – पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या औटी साहेबांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि नेतृत्वामुळे राज्याच्या विकासकामांना नवी गती मिळत असल्याचे सांगत, त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
आजच्या कार्यक्रमाला खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, आमदार अभिमन्यू पवार, भाजप प्रदेश उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मुक्तेश्वर वागदरे, शेषराव पाटील, चंद्रशेखर सोनवणे, शिवलिंग औटी, सुभाषप्पा मुक्ता, ऍड अरविंद मुसांडे, श्री. रविशंकर राचट्टे, राजेश्वर बुके विजयकुमार मिटकरी, संगमेश्वर ठेसे, सुनील मिटकरी, वैजनाथप्पा इळेकर किरणप्पा उटगे, तिपनप्पा राचट्टे, प्रा. भीमाशंकर राचट्टे, डॉ. पटणे सर, राजकुमार पाटील, रवी कारंजे, युवराज हालकुडे सर, व्यंकटराव पन्होळे, बाळु ढोलेश्री. सुनिलप्पा उटगे, बाबुअप्पा उटगे, माजी प्राचार्य औटी सर अदिंची प्रमुख उपस्थिती होती.








