Best News Portal Development Company In India

तुळजापूर पत्रकारांच्या शिरपेचात मानाचा तुरा, पुण्यनगरी चे पत्रकार श्रीकांत (बापू )कदम यांच्या खांद्यावर तुळजापूर आरोग्य कृती दलाची धुरा!

तुळजापूर पत्रकारांच्या शिरपेचात मानाचा तुरा,
पुण्यनगरी चे पत्रकार श्रीकांत (बापू )कदम यांच्या खांद्यावर तुळजापूर आरोग्य कृती दलाची धुरा!
तुळजापूर प्रतिनिधी :- तुळजापूरच्या आरोग्य कृतीदलात पत्रकार श्रीकांत कदम यांची निवड लोकमंगल समूहाकडून सत्कार व शुभेच्छा.
तुळजापूर नागरिकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर प्रभावी जनजागृती आणि तालुकास्तरावर आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या “तालुका आरोग्य संपन्न कृतीदल” समितीत तुळजापूर तालुक्यासाठी पत्रकार श्रीकांत कदम यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे विविध स्तरांतून स्वागत होत असून पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या निवडीच्या पार्श्वभूमीवर लोकमंगल समूहाच्या वतीने पत्रकार श्रीकांत कदम यांचा शाल, श्रीफळ व पेढा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लोकमंगल समूहाचे संचालक सचिन आडगळे, विनोद देवकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, राहुल साळवे, आशुतोष लबडे, नगरसेवक मधुकर शेळके तसेच तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी उपस्थित होते.
दरम्यान, तालुकास्तरावर आरोग्यविषयक जनजागृती, प्रशासन आणि नागरिकांमधील समन्वय वाढविण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले. श्रीकांत कदम यांच्या निवडीमुळे तुळजापूर तालुक्यात आरोग्य विषयक उपक्रमांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. त्यांच्या या निवडीमुळे आरोग्य विषयक समस्या असणाऱ्या रुग्णांनाही पत्रकारांच्या नागरिक आणि प्रशासन यांच्या समन्वयामुळे मदतच होईल.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india