Best News Portal Development Company In India

मी रमाई बोलतेय नाटिकेने माता रमाईस अभिवादन. तुरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.

मी रमाई बोलतेय नाटिकेने माता रमाईस अभिवादन.
तुरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.
त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतीदिना निमित्त डॉ.वैभवी घारगावकर प्रस्तुत मी रमाई बोलतेय नाटिकेचं सादरीकरण शहरातील नगर पालिके समोरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बुधवारी रात्री करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंतकुमार कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून उप नगराध्यक्ष विजय वाघमारे,नगरसेवक बाबा मस्के,अश्विनीताई सोनकांबळे,दि लॉर्ड बुद्धा ट्रस्टचे उपाध्यक्ष मच्छिंद्र सरपे,वंचीत बहुजन आघाडीचे रामभाऊ गायकवाड आदींची उपस्थिती होती.
या वेळी वैभवी घारगावकर यांनी माता रमाईचा त्याग संघर्ष, कुटुंबातील अडीअडचणी लहान मुलांचे आजारपण डॉ बाबासाहेब आंबेडकरांची शिक्षण घेण्याची जिद्द आणि रमाईची त्यांना सात आदी विविध प्रसंग नाट्य छटेतून उलगडून दाखवले.औषध पाण्या वीणा मुलांचं निधन ही गोष्ट तीने बाबासाहेब विदेशात शिकायला असतांना पत्रातून कथन करते त्या अनुभवाने अनेकांचे डोळे पाणावले होते.प्रारंभी त्यागमूर्ती माता रमाईच्या जीवनावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना व संविधान गुणगौरव परीक्षेतील स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष सुरवसे यांनी केले.सूत्रसंचलन संदीप कांबळे,राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले तर प्रा.संजय कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश भालेराव, किरण कांबळे, बाळासाहेब भोसले,सतिश ढोणे,जीवन सूर्यवंशी, आदींनी परिश्रम घेतले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india