Best News Portal Development Company In India

ढोकी पोलिसांची मोठी कारवाई; ‘तेर’ येथे छापा मारून गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या!

ढोकी पोलिसांची मोठी कारवाई; ‘तेर’ येथे छापा मारून गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या!
​तुळजापूर प्रतिनिधी:-अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांची मोठी कारवाई धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पोलीस ठाण्याच्या पथकाने अंमली पदार्थ विक्री विरोधात एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘तेर’ येथे छुप्या पद्धतीने गांजाची विक्री करणाऱ्या एका ४५ वर्षीय आरोपीला पोलिसांनी रंगेहात अटक केली असून, त्याच्याकडून ८० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
​२७ मे २०२६ रोजी ढोकी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) विलास हजारे हे ठाण्यात कार्यरत असताना, त्यांना गुप्त बातमीदाराकडून एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. तेर येथील अच्युत प्रभू पवार नावाचा इसम आपल्या राहत्या घरी गांजाची चोरटी विक्री करत असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती.
​दुपारी दीड वाजता टाकला अचानक छापा
​माहिती मिळताच सपोनि विलास हजारे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या विशेष पथकाने दुपारी ठीक १३:२५ वाजता तेर येथील संबंधित आरोपीच्या घरावर अचानक छापा टाकला. या छाप्यात घरात एक संशयित इसम मिळून आला. पोलिसांनी त्याचे नाव व गाव विचारले असता, त्याने आपले नाव अच्युत प्रभू पवार (वय ४५ वर्षे, रा. तेर, ता. जि. धाराशिव) असल्याचे सांगितले.
​पंच आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत आरोपीची अंगझडती आणि त्याच्या घराची कसून झडती घेण्यात आली. या दरम्यान पोलिसांना घरात हिरव्या रंगाचा, उग्र वास असलेला आणि एकूण १६०० ग्रॅम (१ किलो ६०० ग्रॅम) वजनाचा ‘गांजा’ हा अंमली पदार्थ आढळून आला. या जप्त केलेल्या गांजाची बाजारातील किंमत ८०,००० रुपये इतकी आहे.
​पोलिसांनी तत्काळ सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपी अच्युत पवार याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १८१/२०२६, कलम ८(क), २०(ब)(२)(अ), एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​सदरची धडक कारवाई धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक मा. श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक मा. सचिन पांडकर आणि कळंब विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
​या कारवाईत सपोनि विलास हजारे, पोउपनि माळी, पोउपनि तांबडे, मपोहेकॉ लोहार, पोहकॉ कळसाईन, पोहेकॉ माळी तसेच पोलीस अंमलदार महेश शिंदे, नवनाथ खांडेकर, लक्ष्मण शिंदे, महेश पाडे आणि पटाडे यांच्या पथकाने अत्यंत चोख कामगिरी बजावली आहे. ढोकी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

R53970 Hand holding two bags of different marijuana.
Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india