तुळजापुरात ‘अधिक ज्येष्ठ पौर्णिमे’ला व्ही.आय.पी. पासेस बंद; नियम मोडल्यास होणार थेट कायदेशीर कारवाई!
तुळजापूर प्रतिनिधी :-महाराष्ट्राची आदिशक्ती, आदिमाया मंदिरात राजकीय व्यक्ती आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून दबाव तंत्राचा वापर . खपवून घेतला जाणार नाही. थेट कारवाईचा मंदिर संस्थान चा इशारा. श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये येत्या शनिवार आणि रविवारी ‘अधिक ज्येष्ठ पौर्णिमा’ उत्सव साजरा होत आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी अलोट गर्दी आणि सुरक्षितता लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ३० आणि ३१ मे २०२६ या दोन्ही दिवशी मंदिरातील सर्व प्रकारचे व्ही.आय.पी. (V.I.P.) पासेस पूर्णपणे बंद राहणार आहेत.
मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने यांनी आज एका जाहीर प्रगटनाद्वारे ही माहिती दिली आहे.
गर्दी आणि सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय
सध्या शनिवार-रविवारची सुट्टी आणि त्यातच ‘अधिक मास’ सुरू असल्याने तुळजापुरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळण्याची शक्यता आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि सर्वसामान्य भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, यासाठी प्रशासनाने व्ही.आय.पी. दर्शन स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
व्ही.आय.पी. पासेस बंद: ३०/०५/२०२६ आणि ३१/०५/२०२६ या दोन्ही दिवशी कोणतेही व्ही.आय.पी. पासेस चालणार नाहीत.
पेड पासेस सुरू राहणार आहेत . भाविकांच्या सुविधेसाठी नियमित मिळणारे २०० रुपये आणि ५०० रुपयांचे पेड पासेस (Paid Passes) मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
दबाव आणल्यास थेट कायदेशीर कारवाई! प्रशासनाने पत्रकात स्पष्ट इशारा दिला आहे की, या दोन्ही दिवशी कोणताही अधिकारी, राजकीय व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधी यांनी कोणत्याही माध्यमातून दबाव टाकून किंवा दमदाटी करून व्ही.आय.पी. पासेस मिळवण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.
तरी या दोन्ही दिवशी लोकप्रतिनिधी अथवा राजकीय व्यक्तींनी आई जगदंबेच्या भाविक भक्तांना त्रास होईल असे वर्तन करू नये भाविक – भक्तांच्या दर्शन रंगीत हस्तक्षेप करू नये.







