Best News Portal Development Company In India

शिराढोणमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेले ५ गोवंशीय बैल जप्त, ८ आरोपींवर गुन्हा दाखल!

शिराढोणमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेले ५ गोवंशीय बैल जप्त, ८ आरोपींवर गुन्हा दाखल!
​तुळजापूर प्रतिनिधी :- शिराढोण येथे कत्तलीच्या उद्देशाने मुक्या जनावरांना चारा-पाण्या वाचून अमानुष वागणूक देणाऱ्या इस्मान विरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला शेतगट क्र. २४९ मधील एका गोठ्याच्या पत्राच्या आडोशाला कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत निर्दयतेने बांधून ठेवलेल्या ५ गोवंशीय बैलांची शिराढोण पोलिसांनी सुटका केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी बैलांसह कत्तलीसाठी लागणारे साहित्य असा एकूण ८,६१,१५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी तब्बल ८ जणांविरुद्ध कायदेशीर रित्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, दि. २९ मे २०२६ रोजी सकाळी १०:५० वाजण्याच्या सुमारास शिराढोण पोलीस ठाण्याच्या पथकाला शिराढोण शिवारातील एका शेतात बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शेतगट नं. २४९ मधील मंजूर उस्मान कुरेशी याच्या शेतातील गोठ्याच्या बाजूस असलेल्या पत्राच्या आडोशाला छापा टाकला.
​यावेळी तिथे पाच गोवंशीय बैलांना कोणतीही चारा-पाण्याची व्यवस्था न करता, अत्यंत निर्दयतेने आणि बेकायदेशीररीत्या कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले. तसेच घटनास्थळी कत्तलीसाठी लागणारे साहित्यही पोलिसांच्या हाती लागले.
​गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे:
​पोलिसांनी याप्रकरणी शिराढोण (ता. कळंब) येथील रहिवासी असलेल्या खालील ८ जणांवर गुन्हा नोंदवला आहे:
१. मंजूर उस्मान कुरेशी (वय ४० वर्षे)
२. आयुब ईसाक कुरेशी (वय ६८ वर्षे)
३. खयुम आयुब कुरेशी (वय ४० वर्षे)
४. सिकंदर गुलाममोद्दीन कुरेशी (वय ५२ वर्षे)
५. सिद्दीक हमीद कुरेशी (वय ३५ वर्षे)
६. मुक्तार उस्मान कुरेशी (वय ४८ वर्षे)
७. युनुस पाशा कुरेशी (वय ३२ वर्षे)
८. मुस्तफा उर्फ बबलू नसीर शेख (वय २० वर्षे)
​कायद्यानुसार कडक कारवाई या सर्व आरोपींविरुद्ध शिराढोण पोलीस ठाण्यात सरकारतर्फे प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१) (ज) सह कलम ५(ब)(क), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. तरी अशी घटना कोठेही निदर्शनास आल्यास त्वरित पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india