Best News Portal Development Company In India

कर्तव्यात निष्काळजीपणा भोवला! येरमाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी टी. आर. भालेराव तात्काळ निलंबित धाराशिव पोलीस अधीक्षकांची धडक कारवाई!

कर्तव्यात निष्काळजीपणा भोवला! येरमाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी टी. आर. भालेराव तात्काळ निलंबित धाराशिव पोलीस अधीक्षकांची धडक कारवाई!
​तुळजापूर प्रतिनिधी :- सहनशीलता, कर्तव्यदक्षता आदर, विश्वास, यांचा संगम म्हणजेच महाराष्ट्र पोलीस असे पोलीस जेव्हा आपल्या कर्तव्यापासून दुरावतात तेव्हा काही कठोर निर्णय अधिकाऱ्यांना घ्यावे लागतात. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच आजचे घटना. कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर धाराशिवचे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. येरमाळा पोलीस ठाण्याचे तात्काळ प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव यांना शासकीय कर्तव्यात गंभीर निष्काळजीपणा दाखविल्याप्रकरणी सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
​मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव यांच्याकडे येरमाळा पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून पदभार होता. या कार्यकाळात त्यांच्या हद्दीत घडलेल्या विविध प्रकरणांमध्ये त्यांनी कर्तव्यात कमालीची हलगर्जी आणि निष्काळजीपणा दाखविल्याचे समोर आले होते. शासकीय जबाबदारी पार पाडताना त्यांच्याकडून झालेले गंभीर दुर्लक्ष वरिष्ठ पातळीवर निदर्शनास आले. ही बाब पोलीस दलाच्या शिस्तीला आणि प्रतिमेला बाधा आणणारी ठरल्याने, माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांच्या निलंबनाचे थेट आदेश जारी केले.
​”पोलीस विभागात जबाबदारी आणि शिस्त यांनाच सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. कर्तव्यात कसूर करणाऱ्या किंवा निष्काळजीपणा दाखवणाऱ्या कोणत्याही अधिकारी अथवा अंमलदाराची गय केली जाणार नाही.
​या कारवाईच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाला कडक इशारा दिला आहे. जनतेचे रक्षण आणि कायद्याचे राज्य सुव्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस दलात कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, हे या कारवाईतून स्पष्ट होते.
​सदर कारवाईमुळे धाराशिव पोलीस दलात खळबळ उडाली असून पोलिसांनी सजग राहून सर्वसामान्य नागरिकांना सहकार्य करावे अन्यथा कारवाई सामोरे जावे लागेल याचे भान ठेवावे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आपले कर्तव्य बजावावे असा संदेशच जणू धाराशिव पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india