Best News Portal Development Company In India

तुगाव व उंडरगाव येथील प्रकरणातील तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सह आरोपी करून सदर प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे द्यावा : रिपाइं (आठवले)ची मागणी!

तुगाव व उंडरगाव येथील प्रकरणातील तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सह आरोपी करून सदर प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे द्यावा : रिपाइं (आठवले)ची मागणी
—————————————————-
जळकोट (अरुण लोखंडे )
तुगाव ता.उमरगा येथील दलित तरुणास मारहाण व उंडरगाव तालुका लोहारा येथील अल्पवयीन दलित मुलीचे अपहरण प्रकरणातील तपास अधिकारी यांना सह आरोपी करून त्वरित निलंबित करावे व सदर प्रकरणाचा तपास जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे द्यावा असी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने धाराशीचे जिल्हाधिकारी यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
रिपाइं (आठवले) च्या वतीने जिल्हाधिकारी धाराशिव यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की तुगाव ता.उमरगा येथील आंबेडकरी चळवळीतील दलित तरुण भालचंद्र चोकोबा कांबळे यास येथील जातीवादी गावगुंड रोहित दीपक जोमदे, पंकज शंकर जोमदे,महेश गहिनीनाथ जोमदे व चांद अमीर फकीर सर्व राहणार तुगाव ता.उमरगा यानी संगणमताने कट रचून जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून रोहित जोमदे यांच्या शेतातील द्राक्ष बागेच्या लोखंडी पोलला बांधून लाथा बुक्कीने काठीने व चामडी कमरपट्ट्याने जातीय द्वेशभावनेतून बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.सदर प्रकरणी मुरूम पोलीस ठाणे येते गुन्हा दाखल असून तपास अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार हे चुकीच्या पद्धतीने तपास करत असून आरोपींना अप्रत्यक्षरित्या सहकार्य करत असल्याचे दिसून येत आहे. घटना घडून पंधरा दिवस झाले तरी अद्याप मुख्य तीन आरोपी फरार आहेत. त्यांना अटकपूर्वक जामीन साठी पोलिसाकडूनच सहकार्य करत असल्याचे जाणवते. तरी या प्रकरणाती तपास अधिकारी सदाशिव शेलार यांना सह आरोपी करून त्यांना त्वरित निलंबित करावे व या प्रकरणाचा तपास जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात यावा आणि सदर प्रकरणातील सर्व फरार आरोपींना तात्काळ अटक करावे.
तसेच उंडरगाव तालुका लोहारा येथील एका दलित समाजातील अल्पवयीन सतरा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून अज्ञात ठिकाणी असलेला आरोपी एक महिना झाले अजून लोहारा पोलिसांना सापडलेला नाही.
या प्रकरणाचा तपासी उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार यांच्याकडेच आहे.सदर प्रकरणी ही तपास अधिकारी यांच्याकडून म्हणावा तसा तपास केला जात नाही. शिवाय यातील मुख्य दोन आरोपींना जामीन मिळवून देण्यास त्यांनी सहकार्य केले आहे. तरी याही प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देऊन या दोन्ही प्रकरणात आरोपींना सहकार्य करणाऱ्या तपास अधिकारी सदाशिव शेलार यांना त्वरित निलंबित करा अन्यथा या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन उभे केले जाईल याची नोंद घ्यावी. जिल्हाधिकारी धाराशिव यांना दिलेल्या लेखी निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य कार्यकारणी सदस्य एस.के.चेले,जि.प. चे माजी समाज कल्याण सभापती हरीश डावरे, रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब म्हस्के जिल्हा सचिव एस.के. गायकवाड,,रिपाइंचे तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे, रिपाइंचे धीरज बेळंबकर यशवंत भंडारे,संजय कांबळे, सामाजिक कार्यकर्ते उमेश गायकवाड,अरविंद लोखंडे,नागसेन कांबळे, नीलकंठ कांबळे,सदाशिव कांबळे सह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
सरद निवेदनाच्या प्रती माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब सामाजिक न्याय तथा अधिकारता राज्यमंत्री भारत सरकार, माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य जिल्हा पोलीस अधीक्षक धाराशिव यांना माहितीस्तव देण्यात आलेल्या आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india