परळी येथे धाराशिव/लातूर/बीड स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिक्रत उमेदवार माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मा.ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते सत्कार.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या तथा मंत्री मा. ना. पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी माजी मंत्री बसवराज पाटिल यांनी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून मा. पंकजाताई मुंडे यांनी यथोचित सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी विविध सामाजिक, राजकीय व विकासात्मक विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, प्रा. बी. व्ही मोतीपोवळे सर. भारतीय जनता पक्ष परळी तालुकाध्यक्ष राजेशजी गित्ते, नगरपरिषद गटनेते शपवनजी मुंडे, श दत्तप्पाजी इटगे गुरुजी, श्रीरामजी मुंडे नीलकंठजी साठे तसेच सर्व नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







