Best News Portal Development Company In India

बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय!

बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय!
तुळजापूर प्रतिनिधी:- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी तुळजापूरच्या मंदिरातील प्रकार
सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये तसेच भाविकांची धार्मिक विधी व अधिकृत पुजाऱ्यांकडूनच पूजा व्हावी, यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने अनधिकृत पूजारी व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे.
या पथकात सहायक व्यवस्थापक (धार्मिक), सुरक्षा निरीक्षक, SISPL Pvt. Ltd. चे सुरक्षा पर्यवेक्षक तसेच मंदिर संस्थानचे दोन शिपाई यांचा समावेश आहे. हे पथक मंदिर परिसरात नियमितपणे पाहणी करून अनधिकृत पूजारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवत आहे.
आज सकाळी पथकाने केलेल्या पाहणीदरम्यान अमर वसंतराव शेळके व रवी दत्तात्रय शिरसाट या दोन व्यक्ती अनधिकृतपणे पुजारी व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित व्यक्ती मंदिरातील नियमांचे उल्लंघन करत असल्याचे तसेच त्यांच्या कृतीमुळे मंदिरातील शिस्त व व्यवस्थापनास बाधा निर्माण होत असल्याचे आढळून आले.
या प्रकरणाची नोंद घेऊन संबंधित व्यक्तींना पुढील कारवाई साठी तुळजापूर पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india