Best News Portal Development Company In India

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त उमरगा येथे ५१ शिवभक्तांचे रक्तदान!

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त उमरगा येथे ५१ शिवभक्तांचे रक्तदान .
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५१ शिवभक्तांनी रक्तदान केले.

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त उमरगा शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला. शिवगर्जना परिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५१ शिवभक्तांनी रक्तदान केले. सकाळी प्रविण शिंदे हस्ते सर्वप्रथम पुतळ्यास अभिषेक करण्यात आला. यावेळी आमदार प्रवीण स्वामी, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा उषाताई गायकवाड, प्रा. सुरेश बिराजदार, नगराध्यक्ष किरण गायकवाड, बाळासाहेब माने, माजी नगरसेवक विक्रमबापू बिराजदार, बाजार समितीचे माजी सभापती रणधीर पवार, नगरसेवक सचिन जाधव, शरद पवार, नगरसेविका दिपाली विक्रमबापु बिराजदार, प्रा. सचिन शिंदे, राहुल शिंदे, विजयकुमार नागने, अभिषेक औरादे, गोविंद पवार, भीमा स्वामी, नेताजी कवठे, सुनील साळुंके, विकास सुर्यवंशी, नितीन सुर्यवंशी, प्रविण कोराळे, साई विक्रमबापू बिराजदार, शहाजी येळीकर, विशाल शिंदे, राया चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिंहगर्जना परिवाराचे प्रमुख प्रेमा शिंदे, प्रा. सचिन शिंदे, राकेश कवाळे, सचिन शिंदे, अरुण कुंभार, निखिल बिराजदार, अभय जोगी, वेदांत दूधभाते, आंबांना दूधभाते, संकेत हळेखेडकर आदीसह शिवभक्तांनी परीश्रम घेतले.

सोबत फोटो : शिवराज्याभिषेकदिनानिमित्त नगरसेविका सौ. दिपाली विक्रमबापु बिराजदार यांनी रक्तदान केले. यावेळी जिपच्या उपाध्यक्षा उषाताई गायकवाड, नगराध्यक्ष किरण गायकवाड, विक्रम बापू बिराजदार, शरद पवार, सचिन शिंदे, विकास सुर्यवंशी, साई बिराजदार आदी..

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india